Saturday, June 29, 2024

अर्रर्रर्र! ‘लव्ह लेटर’मुळं पालकांनी चांगलंच चोपलंय साई पल्लवीला, वाचा बालपणीचा मजेदार किस्सा

दक्षिण चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक साई पल्लवी (Sai Pallavi) तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मनमोकळ्या मनाची साई पल्लवी कधीच आपला मुद्दा मांडण्यास मागेपुढे पाहत नाही. दरम्यान, साई पल्लवीने लहानपणीचा एक मजेदार किस्सा सांगितला आहे, ज्यामध्ये तिने लव्ह लेटरमुळे लहानपणी खूप मार खाल्ल्याचे सांगितले आहे.

लहानपणी साई पल्लवीला का पडला मार?
नुकतीच साई पल्लवी नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध चॅट शो ‘माय व्हिलेज’ शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत ‘विराट पर्वम’ चित्रपटाचा मुख्य अभिनेता राणा डग्गुबतीही (Rana Daggubati) उपस्थित होता. अशा परिस्थितीत शोच्या अँकरने साई पल्लवीला बालपणीच्या काही संस्मरणीय गोष्टींबद्दल प्रश्न विचारला. ज्यावर साई पल्लवीने निःसंदिग्ध उत्तर दिले आणि सांगितले की, लहानपणी एकदा आई-वडिलांनी तिला खूप मारले होते. खरं तर साई पल्लवी म्हणाली, “जेव्हा मी सातव्या वर्गात शिकत होते, तेव्हा एका मुलाने माझ्या शाळेच्या बॅगेत प्रेमपत्र टाकले. जे नंतर माझ्या पालकांच्या हाती लागले. त्यानंतर मला खूप मारहाण करण्यात आली.” असे असले तरी, साई पल्लवीने हे अतिशय मजेशीर पद्धतीने सांगितले आहे. (sai pallavi beaten by her parents in childhood for get love letter)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सरी या मराठी चित्रपटात वाजतंय ब्लॉकबस्टर ‘कांतरा’च्या संगीतकाराचे संगीत

बकेटसारखी बॅग घेऊन गेल्याने अनन्या पांडे ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, ‘तिची बॅग तिच्या संघर्षा इतकी…’

हे देखील वाचा