अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) अल्पावधीतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे. दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. सध्या ती ‘श्याम सिंग रॉय’ (Shyam Singh Roy) या तेलगू चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. साईसोबत या चित्रपटात नानी (Nani) आणि क्रिती शेट्टी (Krithy Shetty) हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाची टीम एका लीड चॅनलवर मुलाखतीसाठी पोहोचली होती. जिथे पत्रकाराने या चित्रपटातील किसिंग सीनबद्दल असा प्रश्न विचारला, जो साई पल्लवीला अजिबात आवडला नाही.
राहुल सांकृत्यान दिग्दर्शित ‘श्याम सिंग रॉय’ या चित्रपटात अभिनेता नानी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बंगालच्या पार्श्वभूमीवर बनला आहे. याचा ट्रेलरही रिलीझ झाला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला. या ट्रेलरमध्ये नानी आणि क्रिती यांचा एक किसिंग सीन आहे, ज्यावर ऍंकरने त्यांना प्रश्न विचारला. त्याने क्रिती आणि नानीला प्रश्न विचारला की, “या किसिंग सीनमध्ये दोघांपैकी कोण जास्त अस्वस्थ होत होते?” साईला हा प्रश्न अजिबात आवडला नाही आणि तिने त्याला थांबवत, यावर प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की, असे प्रश्न अस्वस्थ करतात, असे प्रश्न विचारू नका. (sai pallavi get angry over a question asked by journalist on kissing scene)
worst ra lucha @tv9telugu pic.twitter.com/R4VJ7r48AN
— ???? ???? ???? (@NameisSai_) December 20, 2021
साई पल्लवी म्हणाली की, “असे प्रश्न खूप विचित्र वाटतात. दोघांनी सीनच्या आधी एकत्र चर्चा केली आणि जेव्हा त्यांना सोयीस्कर वाटले तेव्हा त्यांनी कथेच्या गरजेनुसार हा सीन केला, पण असे प्रश्न त्यांना अस्वस्थ करतात.” पण असे असतानाही त्या अँकरने पुन्हा एकदा यावर प्रश्न उपस्थित केला. पुढे यावर प्रतिक्रिया देत साई म्हटली की, “तुम्ही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहात, जे चुकीचे आहे.”
साई पल्लवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच चाहते तिच्या उत्तराचे कौतुक करताना दिसत आहेत.
हेही वाचा :