Monday, July 1, 2024

आयफा अवॉर्डमध्ये पाहायला मिळाली चंद्राच्या सौंदर्याची जादू, अमृता खानविलकरच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

अबुधाबीमध्ये नुकताच २२ वा आयफा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. बॉलिवूड जगतातील अनेक रथी महारथींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांच्या धमाकेदार डान्समुळे, अभिनेत्रींच्या ड्रेसमुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीणच वाढली. पण या सोहळ्यात मराठी अभिनेत्रींच्याही सौंदर्याचा जलवा पाहायला मिळाला. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमृता खानविलकरच्या (amruta khanvilkar)सुंदर लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर या मराठी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्या चित्रपटांची सोशल मीडिया पोस्टची नेहमीच चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. सध्या अमृता खानविलकर तिच्या चंद्रमुखी चित्रपटाच्या जोरदार यशामुळे सर्वत्र चर्चेत आहे. चंद्रमुखी चित्रपटातील अमृताचा जोरदार अभिनयाचे आणि तडफदार डान्सचे सर्वत्रच जोरदार कौतुक होताना दिसत आहे. त्याचबरोबर सई ताम्हणकरही आपल्या बोल्ड अदांमुळे नेहमीच चर्चेत असते.

या दोन्हीही मराठी अभिनेत्रींच्या सौंदर्याची जादू आयफा पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर पाहायला मिळाली. पुरस्कार सोहळ्यात अमृता खानविलकरच्या लूकवर सगळ्यांचेच नजरा खिळल्या होत्या. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी अमृताने ब्लॅक ड्रेसमध्ये कहर केलेला पाहायला मिळाला. या ड्रेमवर ती खूपच मनमोहक दिसत होती. तर दुसऱ्या दिवशी अमृताने ब्लु रंगाच्या ड्रेसमध्ये सोहळ्यात सर्वांचेच लक्ष वेधले होते. तिच्या या मनमोहक, सोज्वळ लूकवर सगळेच घायाळ झालेले पाहायला मिळाले. तर अभिनेत्री सई ताम्हणकरनेही या कार्यक्रमात आपल्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. सईला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा