×

चंद्रमुखीने घेतली आकाशात झेप! अमृता खानविलकरने एयरपोर्टवर सादर केली ठसकेबाज लावणी

कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार म्हटल्यावर सिनेमाचे प्रमोशन ओघाने येतेच. आता आपला चित्रपट प्रदर्शित होतोय हे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमाचे प्रमोशन केले जाते. सध्या मनोरंजनविश्वात, सोशल मीडियावर एका आणि एकाच सिनेमाची तुफान चर्चा रंगली आहे, आणि तो सिनेमा म्हणजे अमृता खंवळीकर आणि आदिनाथ कोठारे अभिनित ‘चंद्रमुखी’. अगदी सिनेमाच्या घोषणेपासूनच या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. हळहळू या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनातील सर्वच प्रश्नाचे समाधान केले. आज (२९ एप्रिल) रोजी सिनेमा प्रदर्शित झाला असून, या सिनेमाच्या टीमने चित्रपटाचे अतिशय दणक्यात प्रमोशन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

शक्य तेवढ्या ठिकाणी जात, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये चंद्रमुखी सिनेमाचे प्रमोशन करण्यात आले. सिनेमाच्या टीमने या चित्रपटाचे अतिशय तगडे प्रमोशन केले. चंद्रमुखीचे प्रमोशन आणि या प्रमोशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजले मात्र यातच एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे चक्क एयरपोर्टवर चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

झाले असे की, चंद्रमुखीला स्पाईस जेटवर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. झाले असे की, चंद्रमुखी सिनेमाचे पोस्टर स्पाईस जेटच्या एका फ्लाईटवर लावले गेले. त्याचा एक जंगी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एयरपोर्टवर रंगला होता. यावेळी अमृताने तिच्या खास अंदाजात एक मस्त लावणी देखील सादर केली. लाल कारपेटवर अमृता खानविलकरने डान्स केला. यासोबतच आदिनाथ कोठारेने देखील त्याच्या चंद्रासोबत हजेरी लावली.

View this post on Instagram

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

या सोहळ्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आदिनाथ कोठारेने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझी चंद्रमुखी आता आकाशात झेप घेणार ! उद्यापासून ती तुम्हा माय बाप प्रेक्षकांची होणार ! माझ्या चंद्राची काळजी घ्या.. घेणार नं ? – दौलत” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असून अमृताच्या लूकची देखील चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रसाद ओकने दिग्दर्शित केला असून, हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असून, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post