Thursday, April 18, 2024

‘डान्स आणि एक्टिंग येत नाही’ म्हणत नेटकऱ्यांनी सई ताम्हाणकरचा डान्स पाहून केले ट्रोल

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला ‘वेड’ लागले आहे. हो खरंच…रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ सिनेमाचे वेड सर्वांना लागले आहे. ३० डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित झाला. आता जवळपास २५ दिवस होऊनही सिनेमाची लोकांमध्ये असलेली क्रेझ कमी व्हायचे नाव घेत नाही. आज इतक्या दिवसांनी देखील चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा हाऊसफुल्ल होत आहे. बऱ्याच काळाने मराठी चित्रपटांना ‘वेड’च्या निमित्ताने हाऊसफुल्लचा बोर्ड पाहायला मिळाला. या सिनेमासोबतच सिनेमाच्या गाण्यांनी देखील लोकांना वेड लावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

‘वेड’ सिनेमातील ‘मला वेड लागले’ हे गाणे तर तुफान गाजताना दिसत आहे. जिथे तिथे फक्त याच गाण्याचा बोलबाला आहे. सोशल मीडियावर, रिल्समध्ये, व्हिडिओमध्ये या गाण्याने नुसता दंगा केला आहे. सलमान खान आणि रितेश देशमुखवर चित्रित झालेले हे गाणे आणि गाण्याची हुक स्टेप कलाकारांमध्ये देखील हिट झाली आहे. नुकतेच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हे पुरस्कार संपन्न झाले. यावेळी रेड कार्पेटवर सूत्रसंचालक होता अभिनेता शुभंकर तावडे. शुभंकरने देखील वेड सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे.

तर महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या सोहळ्याला आलेल्या सर्व कलाकरांना शुभंकरने रेड कार्पेटवर ‘मला वेड लागले’ या गाण्यावर डान्स करायला सांगितला. यात अभिनेत्री सई ताम्हणकर देखील होती. शुभंकरने तिला गाण्याची हुक स्टेप सांगितली मात्र तिला ती काही केल्या आली नाही. तिने चुकीची स्टेप केली. शुभंकरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सईला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी तिला ‘एवढी छोटीशी स्टेप पण हिला येत नाही का?’, “सई ताम्हणकर एवढी मोठी अभिनेत्री असूनदेखील तिला जमलं नाही. माझी छोटीशी मुलगी छान करते.”, “स्टेप्स बघायला वेळ नाही मिळाला म्हणून तू शिकवतोय… पण काय फायदा, तिने ते चुकीचं केलंय.”, “तुला डान्स आणि एक्टिंग येत नाही,” असे म्हणत तिला ट्रोल केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वनिता खरात लवकरच अडकणार लग्न बंधनात, शेअर केले प्री- वेडिंग फाेटाेशूट

घई साहेबांनी माधुरीला नाकारत दिली होती महिमाला पसंती, ‘हा’ किस्सा ऐकून तुम्हालाही वाटेल नवल

हे देखील वाचा