Thursday, May 23, 2024

सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोवर सईची हटके कमेंट; म्हणाली, ‘मॅडम तुमच…’

मराठी सिनेसष्टीतील ‘अप्सरा‘ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. सोनालीने तिच्या अभिनेयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे.ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शअर करत असते. सोनालीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोनाली तिचे आणि तिच्या मैत्रिनीचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांचे मैत्रीचे नाते खूप स्पेशल आहे. त्या दोघी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात.

नुकतेच सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) तिच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर सई ताम्हणकरने सोनालीच्या नवीन घराचे कौतुक केले. त्यावर सोनालीने दिलेली प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरली आहे. सोनाली कुलकर्णी आणि तिचा नवरा कुणाल बेनोडेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केले आहे. या घराच्या फोटो सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

या फोटोंवर सई ताम्हणकरने “क्यूटी” अशी कमेंट केली. यावर सोनालीने प्रतिसाद म्हणून लिहिले, “ते सर्व ठीक आहे, पण तू तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेस ते सांग आधी.” सोनालीच्या या प्रतिसादावर सईने उत्तर दिले. तिने लिहिले, “तुमचं लंडन, दुबई झालं की सांगा मॅडम.” यावर सोनालीने “राहू दे, राहू दे” असे म्हणत कमेंट केली. सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांचे हे मैत्रीचे नाते नेहमीच प्रेरणादायी ठरते. त्यांचे संवादही नेहमीच रसिकांना आवडतात.

सोनालीने आपल्या दुबईतील नव्या घरामध्ये लेटेस्ट फोटोशूट केले आहे. चॉकलेटी रंगाची ट्रेडिशनल साडी, केसात गजरा, गळ्यात ट्रेडिशनल ज्वेलरी परिधान करुन अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे. सोनालीने हे फोटो शेअर करताना ‘पाडवा नवीन घरात’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केले. सोनाली कुलकर्णीने 2021 मध्ये दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले होते. दोघेही सध्या दुबईत राहतात. सोनालीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लवकरच ती ‘छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. (Sai Tamhankar made a harsh comment on Marathi actress Sonali Kularni photo)

आधिक वाचा-
देवोलिना भट्टाचार्जीने अंकिता – विकीच्या नात्यावर केले मोठे विधान; म्हणाली, ‘ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा…’
सुशांत सिंग राजपूतवरील चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, अभिनेत्याच्या वडिलांनी केली याचिका दाखल

हे देखील वाचा