Thursday, April 3, 2025
Home मराठी सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो पाहून, ‘या’ संगीतकाराला देखील आवरला नाही कमेंट करण्याचा मोह, म्हणाला…

सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो पाहून, ‘या’ संगीतकाराला देखील आवरला नाही कमेंट करण्याचा मोह, म्हणाला…

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिच्या पदरी पडलेली प्रत्येक भूमिका तिने अगदी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने निभावली आहे. ती अनेकवेळा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक आगळावेगळा अंदाज तिने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

सईने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने साधारण ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे. तसेच यावर तिने एक जॅकेट घातले आहे. फोटोमध्ये तिने सगळे केस मागे बांधले आहेत. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या बोल्ड पोझ देताना दिसत आहे. फोटोमधील तिचा मेकअप देखील तिचा लूकला साजेसा असा आहे. ( Sai Tamhankar share her bold photo on social media)

तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. तिचा प्रत्येक लूक तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असतो. या लूकला देखील चाहते खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. खास गोष्ट म्हणजे तिच्या या फोटोवर गीतकार, संगीतकार आणि गायक अतुल गोगावले याने कमेंट केली आहे की, “परम परम परम, परम सुंदरी.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

हेही वाचा :

अखेर ऋता दुर्गुळे अडकली नवीन बंधनात, प्रतीक शाहसोबत झाला थाटात साखरपुडा पार

आवाजाच्या दुनियेतील जादूगारांनी केली बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकांना दिले अवघड टास्क

मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता अडकला लग्न बंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

 

 

हे देखील वाचा