आवाजाच्या दुनियेतील जादूगारांनी केली बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकांना दिले अवघड टास्क


बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व संपण्यास आता केवळ ३ दिवस राहिले आहेत. घरात नुकतेच शेवटचे एलीमिनेशन झाले आहे. घरातून मीरा जगन्नाथ बाहेर गेली आहे. त्यामुळे आता या शोला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. विशाल विकास, मीनल, जय आणि उत्कर्ष हे पाच स्पर्धक राहिले आहेत. या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. तसेच आता शेवटच्या दिवसात देखील शोमध्ये अनेक सरप्राइज पाहायला मिळाले आहेत. अशातच घरात रेडिओ आरजे यांची एन्ट्री झाली आहे आणि ते स्पर्धकांना वेगवेगळे स्पर्धक विचारात आहेत.

घरात आरजे शोनाली, आरजे स्मिता, आरजे बंड्या, आरजे श्रुती आले आहेत. म्हणजेच टीव्हीच्या माध्यमातून ते घरातील स्पर्धकांची संवाद साधत आहेत. बिग बॉसने सगळ्यांना सांगितले की, घरात त्यांना खूप मोठे सरप्राइज मिळणार आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश झाले. (Bigg Boss Marathi 3 : radio anchor enter in BBM house)

यावेळी सगळे आरजे घरातील स्पर्धकांना प्रश्न विचारतात तसेच अनेक खेळ खेळतात. शोच्या शेवटच्रा क्षणी एकमेकांविरोधात प्रश्न विचारल्यामुळे आता सगळे संभ्रमित झाले आहेत. या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो बघून येणारा एपिसोड खूप रंगतदार असणार आहे यात काही शंकाच नाही.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा फिनाले २६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता या पर्वाचा विजेता कोण होईल याची सगळेजण वाट पाहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसातच समजेल की, या पर्वाचा विजेता नक्की कोण होणार आहे. घरातून मीरा जगन्नाथ बाहेर गेल्यामुळे घरातील सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. सगळ्यांना असे वाटले होते की, आता टॉप ६ स्पर्धक असतील. परंतु बिग बॉसने पहिल्यांदा मिडविक एलीमिनेशन केले आहे.

हेही वाचा :

हरभजन सिंगने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पत्नी गीता बसराने लिहिली भावनिक पोस्ट, दिले नव्या इनिंगचे संकेत

रोहमन शॉलपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन होती ‘या’ व्यक्तींच्या प्रेमात

मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता अडकला लग्न बंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

 


Latest Post

error: Content is protected !!