सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटात काम करून तिने यश प्राप्त केले आहे. चित्रपटात साधू भूमिका असो, बोल्ड भूमिका असो किंवा रावडी भूमिका असो. तिने तिचे प्रत्येक पात्र खूप प्रामाणिकपणे निभावले आहे. अशा अनेक भूमिका पार केल्यानंतरही अशी एक भूमिका आहे जी साकारण्याची सईची खूप इच्छा आहे. याबाबत तिने तिच्या एका मुलाखतीत खुलासा देखील केला आहे. नुकतेच सईचा पाँडिचेरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. स्मार्ट फोनवर प्रदर्शित होणारा तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. यानिमित्त तिने दिल खुलास गप्पा मारल्या. यावेळी तिने तिची इच्छा व्यक्त केली आहे.
सईने सांगितले की, तिला पुरुष भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे. तिची ही इच्छा ऐकून सगळेच चकित झाले. सईने अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता तिने ही भूमिका साकारून जर तिचे स्वप्न पूर्ण केले तर चाहत्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट असणार आहे.
‘पॉंडीचेरी’ चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत बोलताना सई म्हणाली की, “यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.” तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ”माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले.”
सईने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तिच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका तिने प्रामाणिकपणे निभावली आहे.
हेही वाचा :
मुलाच्या आठवणीत भावुक होऊन रडायला लागली रेसलर बबीता फोगाट, कंगना रणौतने दिला आधार
‘रुद्रा’ वेब सीरिजमधील डॉक्टर आलिया वैयक्तिक आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, साऊथमध्ये देखील केलंय काम
अक्षरा सिंगने केला ‘ओ बोलेगा’ गाण्यावर डान्स, ठुमक्यांनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका