×

‘पाँडिचेरी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सई ताम्हणकरने केला क्लासी लूक, चाहत्यांनी केले कौतुक

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

सई ताम्हणकरचा ‘पाँडिचेरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सईने खास लूक केला होता. त्याची झलक तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. सईने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सईने आळशी रंगाचा स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे. तसेच त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. तिने सगळे केस मागे बांधून एक कलासी लूक केला आहे. तसेच तिने हाय हिल्स घातले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने ‘पाँडिचेरी’ असे लिहिले आहे. (Sai tamhankar new look on pondecheri pramotion, see photos)

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण हा फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सईने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तिच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका तिने प्रामाणिकपणे निभावली आहे.

हेही वाचा :

Latest Post