Monday, December 16, 2024
[aioseo_breadcrumbs]

व्हायरल फोटोमुळे शेफाली वैद्य यांची सई ताम्हणकरवर जोरदार टिका; म्हणाल्या, ‘कोणती हिंदू स्त्री…’

सध्या देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोश पाहायला मिळत आहे. सर्वांच्याच घरी बाप्पांचे आगमन झाले असून सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारही मागे नाहीत. अनेक सेलिब्रेटींच्या घरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकर मात्र वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होताना दिसत आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिचा एका इंग्रजी वृत्तपत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर लेखिका, प्रवक्त्या आणि उद्योजिका शेफाली वैद्य यांनी जोरदार टिका केली आहे. सईच्या या व्हायरल फोटोमध्ये ती टिकली न लावताच गणरायाची मुर्ती हातात घेवून उभी असल्याचे दिसत आहे ज्यामुळे शेफाली वैद्य यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

शेफाली वैद्य यांनी आपल्या व्हायरल ट्विटमध्ये कोणती हिंदू स्त्री टिकली न लावता गणरायाला घरी घेवून जाईल असा सवाल केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी यामध्ये एवढे धारेवर धरण्यासारखे काहीच झाले नाही असे म्हणत त्यांचीच उलट तपासणी केली आहे. त्यामुळे या वादाची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकरला नुकताच आयफा अवॉर्ड मिळाला आहे ज्यामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘तेव्हा सत्याची किंमत मातीमोल होते…’ लालसिंग चड्ढाचे लेखक अतुल कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत
कहानी घर घर की’मधून करिअरची सुरुवात, ‘या’ शोने बदलले आमिर अली मलिकचे आयुष्य
अरे बापरे! सुकेशने जॅकलीनसाठी ओतला पाण्यासारखा पैसा, श्रीलंकेत घेतला होता ‘इतक्या’ कोटीचा बंगला

हे देखील वाचा