बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या दमदार अभिनयासाठी सिनेसृष्टीत विशेष प्रसिद्ध आहे. लालसिंग चड्ढा चित्रपटातून आमिर खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार होता. त्यामुळेच या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र लालसिंग चड्ढावर पहिल्या दिवशीपासूनच प्रेक्षकांचा प्रचंड रोश पाहायला मिळाला. ज्यामुळे हा चित्रपट चांगलाच आपटला. चित्रपटाला देशभरात समाधानकारक कामगिरी करता आली नाही. अशातच चित्रपटाचे लेखक अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सिने जगतात सध्या लालसिंग चड्ढा चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजणार अशी प्रत्येकालाच आशा होती. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांकडून होताना दिसत होती. ज्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झालेला पाहायला मिळाला. इंग्रजी चित्रपट फॉरेस्ट गंपचे हे हिंदी वर्जन होते. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आता चित्रपटाचे लेखक अतुल कुलकर्णी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ज्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
When destruction is celebrated as if it were a spectacle, the harsh truths are reduced to debris. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) August 28, 2022
अतुल कुलकर्णी हे लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सध्या त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये जेव्हा विनाश मोठ्या कामगिरीप्रमाणे मिरवले जातात, तेव्हा सत्याची किंमत मातीमोल होते असे विधान केले आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हे ट्विट लालसिंग चड्ढा फ्लॉप ठरल्यामुळेच केले असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – कहानी घर घर की’मधून करिअरची सुरुवात, ‘या’ शोने बदलले आमिर अली मलिकचे आयुष्य
केजीएफ स्टार यशने राम मंदिराला दिले ५० कोटी? व्हायरल फोटोनंतर बॉलिवूडवर टिकेची झोड
जीवापेक्षाही जास्त प्रिय असणाऱ्या हृतिकवर राकेश रोशन यांनी का उचलला होता हात? कारण आहे खूपच मोठे