‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित, या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.
हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.
याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!”
‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सोनी मराठी वाहिनी सादर करीत आहे कीर्तनावर आधारित भारताचा पहिला रिअॅलिटी शो
परदेशात राहून शाहीर खान झाला शाहरुख खान नावाने प्रसिद्ध; जाणून घ्या त्याची कारकीर्द