Saturday, July 6, 2024

भूतांना पकडायला निघणार विभूती आणि चिरौंजी भावांची जोडी, हॉरर कॉमेडीमधून प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा तडका

चित्रपटगृह जरी बंद असले तरी आता निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना ओटीटी प्लॅटफॉर्मचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेक लहानमोठे सिनेमे आता अतितीव्र प्रदर्शित होण्यास सुरवात झाली आहे. या चित्रपटांमध्ये आता ‘भूत पोलीस’ या नव्या सिनेमाची देखील भर पडणार आहे. अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस याचू मुख्य भूमिका असणाऱ्या ‘भूत पोलीस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हॉरर कॉमेडी असणारा हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांना मनोरंजनाचे एक परिपूर्ण पॅकेजच असणार आहे.

सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अर्जुन आणि सैफची जमून आलेली केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडत आहे. त्याचबरोबर यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या दोन अभिनेत्री देखील एकत्र दिसणार आहेत. ट्रेलर बघता हे चौघं जणं धमाल करत असून, त्यांची ही धमाल, मजा मस्ती प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जोरदार हसू आणणार हे नक्कीच. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडत असून, या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘भूत पोलीस’ हा सिनेमा १७ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. (Saif Ali Khan Arjun Kapoor Starrer Movie Bhoot Police Trailer Released)

भूत पोलीस या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे धर्मशाळा, डलहौजी आणि जैसलमेर येथे करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग कोरोना महामारीच्या काळात सर्व काळजी घेत करण्यात आले. ‘भूत पोलीस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानीने केले आहे. तर रमेश तौरानी आणि आकाश पुरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

भुतांना पकडणाऱ्या दोन भावांची गोष्ट या सिनेमातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. भूत पकडून स्वतःचे पोट चालवणाऱ्या या भावांच्या आयुष्यात अचानक एक वळण येते आणि त्यांचं जीवन बदलते. अशी एकंदरीत या चित्रपटाची कथा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! जेह देखील आहे ‘लाल सिंग चड्ढा’च्या रोमँटिक गाण्याचा भाग? करीनाने केला खुलासा

कौतुकास्पद! पर्वतारोही उमा सिंगने सोनू सूदला केला विजय समर्पित; म्हणाला, ‘खऱ्या आयुष्यातील हीरोला पहिल्यांदाच भेटलो आणि…’

सैफ अली खानने भाड्याने दिले त्याचे फॉर्च्युन हाइट्समधील घर; ‘इतके’ पैसे मिळूनही दरवर्षी वाढत जाणार रेंट

हे देखील वाचा