Monday, June 2, 2025
Home बॉलीवूड सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे; दाखल केले १००० पानांचे आरोपपत्र

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे; दाखल केले १००० पानांचे आरोपपत्र

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांना आरोपींविरुद्ध महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी एका हल्लेखोराने अभिनेत्यावर चाकूने वार केले होते. या प्रकरणात पोलिसांना आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. पोलिसांनी १००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

‘मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात वांद्रे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अटक केलेल्या आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध पोलिसांना सापडलेले अनेक पुरावे समाविष्ट आहेत. हे आरोपपत्र १००० पेक्षा जास्त पानांचे आहे. या आरोपपत्रात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘गुन्ह्याच्या ठिकाणी, सैफ अली खानच्या देहावरून आणि आरोपीच्या देहावरून सापडलेले चाकूचे तुकडे हे एकाच चाकूचे तीन तुकडे आहेत, असे आरोपपत्रात म्हटले आहे. याशिवाय, तपासादरम्यान पोलिसांना सापडलेल्या आरोपीच्या डाव्या हाताच्या फिंगरप्रिंट रिपोर्टचाही उल्लेख करण्यात आला आहे.

अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली आरोपी शरीफला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. हल्ल्यादरम्यान अभिनेत्याच्या मणक्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा आणि घटनास्थळी सापडलेला एक भाग शरीफ-उलकडून मिळालेल्या शस्त्राशी जुळत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर सैफ उपचारासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. या हल्ल्यात अभिनेत्याला अनेक गंभीर दुखापती झाल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित – उत्कंठावर्धक, भावनांनी भरलेला थरारक अनुभव देण्याची हमी
‘चेटकिणीसारखे हास्य’ या विधानानंतर अमर कौशिकने मागितली श्रद्धा कपूरची माफी

हे देखील वाचा