कलाकार आणि त्यांचे मुलं म्हणजे मीडियासाठी, फॅन्ससाठी चर्चेचा मोठा विषय असतो. स्टार्सकिड्स म्हणजे आकर्षणाचे केंद्र असतात. कधी कधी तर कलाकारांपेक्षा अधिक फुटेज त्यांचे मुलंच घेऊन जाताना देखील दिसतात. बॉलिवूडमधील दोन मुलं म्हणजे पॅपराजी आणि फॅन्ससाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतात. ही मुलं आहेत नवाब खानदानातील तैमूर अली खान आणि जेह अली खान. करीना आणि सैफच्या या दोन्ही मुलांनी अतिशय कमी वयात त्यांची तगडी फॅन फॉलोविंग निर्माण केली आहे. या दोघांबद्दल सतत काहींना काही ऐकिवात येत असते. लोकांना देखील त्यांच्याबद्दल जाऊन घ्यायला खूप आवडते. आज करीना आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर त्याचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर करीनापासून ते नेटकऱ्यांपर्यंत सर्वच लोकांनी तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आशीर्वाद दिले.
तैमूर आज (२० डिसेंबर) ला पाच वर्षाचा होत असला तरी त्याची लोकप्रियता आणि फॅन फॉलोविंग कोणत्याही मोठ्या कलाकाराला देखील मागे टाकेल एवढी आहे. एवढ्या छोट्याशा तैमूरसाठी पॅपराजी तासंतास त्याच्या घराबाहेर थांबलेले दिसतात. अगदी त्याचा जन्म झाला तेव्हापासूनच तैमूर मीडियामध्ये आणि पॅपराजींमध्ये आकर्षणाचा बिंदू ठरला. करीना आणि सैफ दोघांनाही तैमूरला साधे आणि लाइमलाईटपासून लांब असलेले जीवन दयायचे होते. मात्र हे काही शक्य झाले नाही. त्याच्या पालकांसोबतच स्वतः तैमूरला देखील हे समजले की, पॅपराजी त्याच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणूनच तो आता स्वतःहून कॅमेऱ्यासमोर येत वेगवेगळ्या पोज देताना दिसतो.
एका मुलाखतीमध्ये करिनाने सांगितले होते की, “मला तैमूरला वाढवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मला सर्वांत जास्त त्रास त्याच्या जेवणाच्या वेळेस झाला. मी खूपच जास्त ओव्हरप्रोटेक्टिव्ह आई आहे. मला पहिल्यांदा आई होण्याचा अनुभव तैमूरनेच दिला. मला तैमूर दररोज खूप काही शिकवतो.”
पुढे करीना म्हणाली, “तैमूर माझ्यामधून सर्वांत उत्तम आणि सर्वांत वाईट समोर आणण्याची क्षमता ठेवतो. कधी कधी मी हिम्मत हारून बसते आणि मला तर घाम येण्यास सुरुवात होते. जेवण ही अशी गोष्ट आहे, ज्यावर नेहमीच आमचे वाद होतात. तैमूरला जेवण करायचे नसते. तो म्हणतो, मला हे नाही खायचे, मला ते नाही खायचे. तेव्हा मला काहीच समजत नाही. मी त्याला सांगते की, तुला तुझा पराठा हा खावाच लागेल. याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही.”
याशिवाय करिनाने तैमूरच्या करिअरबद्दल देखील मुलाखतीमध्ये सांगितले होते. ती म्हणाली होती की, “तैमूरला मोठे होऊन ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यात तो करू शकतो. त्याला शेफ बनायचे तर तो शेफ बनू शकतो, पायलट व्हायचे तर पायलट होऊ शकतो. मी फक्त त्याला खुश बघू इच्छिते. मी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही. मी त्याच्यावर असा दबाव टाकू शकत नाही की, त्याचे पालक यशस्वी आहेत तर त्याने देखील यशस्वी बनावे.”
तैमूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत तिने तैमूरचा तो पहिल्यांदा चालत असतानाच जुना व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
हेही वाचा-