काजल अग्रवालच्या घरी येणार चिमुकला पाहुणा? अभिनेत्रीचे ‘बेबी बंप’ पाहून प्रेग्नेंसीच्या चर्चेला उधाण!


अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) या दिवसांत तिच्या गरोदरपणाच्या चर्चेमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये म्हटले जात आहे की, काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू हे दोघे लवकरच आई बाबा होणार आहेत. याच दरम्यान काजल अग्रवालचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत असल्याचे म्हटले जात आहे.

अलीकडेच काजल अग्रवालने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजल अग्रवाल तिची बहीण निशा अग्रवाल आणि तिच्या मुलांसोबत पोझ देताना दिसली. हे फोटो पाहून असे वाटत आहे की, काजल अग्रवाल प्रेग्नंट असल्यामुळे तिचे बेबी बंप दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर चाहते काजलच्या गरोदरपणाबद्दल अंदाज बांधू लागले आहेत. मात्र अद्याप काजल आणि तिचा पती गौतमने याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही.

Photo Courtesy: Instagram/kajalaggarwalofficial

काजलने अलीकडेच गरोदर असलेल्या बातमीवरील मौन तोडले होते. एका मुलाखतीमध्ये तिने स्पष्ट सांगितले होते की, वेळ आल्यानंतर ती स्वतः या गोष्टींवर बोलेल. मात्र यावेळी तिने गरोदरपणाच्या बातम्या नाकारल्या नाही आणि स्वीकारल्या देखील नाही. तिने या गोष्टीवर अजूनही मौन बाळगले आहे.

काजल अग्रवालने गेल्यावर्षी तिच्या प्रियकराबरोबर मुंबई येथे लग्न केले होते. गौतम आणि काजलचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दरम्यान काजल, चिरंजीवी आणि रामचरण यांच्या ‘आचार्य’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. काजल कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ मध्ये देखील दिसणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!