Saturday, June 29, 2024

सैफ अली खानने हटवला करीनाच्या नावाचा टॅटू; पण का? चाहते संभ्रमात

बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा ग्रेट कपल्सची चर्चा होते तेव्हा सैफ अली खान आणि करीना कपूर यांचेही नाव घेतले जाते. दोघेही ऑक्टोबरमध्ये लग्नाला 12 वर्षे पूर्ण करणार आहेत. लग्नाला इतक्या वर्षानंतरही दोघे कपल्स गोल देत असतात. काही काळापूर्वी दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते इमारतीबाहेर किस करताना दिसले होते. आता सैफ अली खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त, सैफ अली खान आणि करीना कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. अलीकडेच सैफ अली खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सैफने करीनासाठी बनवलेला टॅटू काढल्याचे चित्र दिसत आहे. सैफच्या या निर्णयामुळे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले असून ते विविध प्रकारचे अंदाज लावत आहेत.

सैफ अली खानच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये करीना कपूरच्या टॅटूऐवजी त्याच्या हातावर शिवजींच्या त्रिशूळाचा टॅटू दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते विचारत आहेत की सैफ आणि करीना घटस्फोट घेणार आहेत का? सैफच्या हातावर त्रिशूल पाहिल्यानंतर काही चाहते आनंदी आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘त्याने शिवजीचा त्रिशूळ बनवला आहे, हर हर महादेव’. तर आणखी एका व्यक्तीने कमेंट करून ‘जय महाकाल’ असे लिहिले. आणखी एका युजरनेही अशाच कमेंटमध्ये भगवान शिवाचे त्रिशूळ पाहून आनंद व्यक्त केला.

सैफ अलीच्या टॅटूमध्ये झालेल्या बदलामागे अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. असे म्हटले जात आहे की, कदाचित एखाद्या चित्रपटामुळे अभिनेत्याने हा टॅटू बदलला असेल. सैफ अली खान देवरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. अशा परिस्थितीत हा टॅटू त्याच्या नव्या चित्रपटासाठी असण्याची शक्यता आहे.

भगवान शिवाच्या त्रिशूळाचा हा टॅटू कायमस्वरूपी नसल्याचा दावाही अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. शुटिंगनंतर सैफ हा टॅटू काढू शकतो. सैफ अली खान शेवटचा आदिपुरुष चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो रावणाच्या भूमिकेत होता. ज्यासाठी अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुनील पॉलने पुन्हा घेतला कपिलच्या शोवर आक्षेप, डफलीला म्हटले अश्लील
मोठी बातमी ! राखी सावंत रुग्णालयात दाखल; हृदयाच्या गंभीर आजाराने अभिनेत्री पीडित

हे देखील वाचा