Saturday, June 29, 2024

करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लहान मुलगा जेह म्हणजेच जहांगीर जेव्हा त्यांच्यासोबत शहरांतून बाहेर निघतो, तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. जेहचे क्यूट फोटो सोशल मीडियावर जेव्हा व्हायरल होतात, तेव्हा नेटकरी स्वतःलाच प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकत नाहीत. अलीकडेच जेहचा आपल्या आत्यासोबतचा (सबा) फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या आत्याच्या मांडीवर बसला आहे. तसेच जेहसोबतचा सर्वात क्यूट आणि कधी न पाहिलेला हा फोटो सबाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चाहते सातत्याने या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अलीकडेच सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जेह आपल्या मांडीवर खेळतानाचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीनाचा लहान मुलगा जेह हा आपल्या आत्याच्या मांडीवर खेळताना आणि तोंडात बोट टाकून चोखताना दिसत आहे. याशिवाय तो आपल्या आत्यासोबत वेळ घालवताना आणि खेळताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मिस यू जेह जानू.” या फोटोला आतापर्यंत १० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

जसा सबाने जेहसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तसे चाहत्यांची या फोटोवर मनमोहक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली. एका चाहत्याने लिहिले की, “तो नेहमी बोट चोखत असतो.” दुसऱ्याने गाण्याचे बोल लिहित कमेंट केली की, “तेरा मुझसे है पहले का नाता कोई.” आणखी एकाने लिहिले “क्यूट बेबी.”

मंगलवारी (२६ ऑक्टोबर) जेह आपला मोठा भाऊ तैमुर आणि आई- वडील सैफिनासोबत बाहेर जाताना स्पॉट झाला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, ते दोघे शहराच्या बाहेर एकमेकांना वेळ देण्यासाठी आणि फिरायला गेले होते.

जेहचा आणि तैमुर यांचा जसा जन्म झाला आहे, तसे ते दोघे कायम सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहेत. करीनाला या दोघांच्या नाव ठेवण्यावरून ट्रोल करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋतिक रोशनकडून ‘विक्रम वेधा’च्या ऍक्शन टीमला खास गिफ्ट; आपली परंपरा ठेवली अबाधित

-‘मी तिचे सिनेमे बघत नाही कारण…, म्हणत ‘या’ अभिनेत्री सांगितले अनन्या पांडेचे सिनेमे न बघण्याचे कारण

-जाळ अन् धूर संगटच! मोनालिसाने क्रॉप टॉप ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा