सात जुलै २०२१ रोजी महान भारतीय अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही न भरणारे नुकसान आहे आणि त्यांची उणीव चाहत्यांना सतावत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला. पण त्यांच्या जाण्याने सायरा बानू (Saira Banu) यांचा जणू जीवनच गेले. आज (२३, ऑगस्ट) सायरा बानो यांचा वाढदिवस.
सायरा बानू यांचे संपूर्ण आयुष्य दिलीप यांच्याच्या अवतीभोवतीच गेले. त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांची काळजी घेणं… यातच सायरा बानूंचा अख्खा दिवस जात असे. त्यांनी दिलीप कुमार यांना क्षणभरही एकटे सोडले नाही. पण आता त्यांच्या जाण्यानंतर त्या एकट्या आहेत आणि निराशही झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, त्यांनी सगळ्यांना भेटणे बंद केले आहे आणि त्या कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाहीयेत. (saira banu is gone in to shell after the demise of dilip kumar)
अभिनेत्री मुमताज यांनी केला होता भेटण्याचा प्रयत्न
एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मुमताज (Mumtaaz) यांनी सांगितले की, त्यांनी सायरा बानूला अनेक कॉल केले, पण त्यांनी उत्तर दिले नाही. यानंतर त्या त्यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावरही गेल्या. पण तिथेही त्या त्यांना भेटू शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत दिलीप यांच्या निधनानंतर सायरा बानू एकांतात गेल्याचे दिसत आहे.
धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनीही चिंता व्यक्त केली
केवळ मुमताजच नाही, तर अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) यांनीही सायरा बानूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचेही अभिनेत्रीशी बोलणे होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत इंडस्ट्रीतील लोक आता सायरा बानूंबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.
१९६६ मध्ये झाला होता दोघांचा विवाह
सायरा बानू आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचा विवाह ११ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला होता. दोघांच्या वयात खूप अंतर होतं. लग्नानंतर दोघे कधीच वेगळे झाले नाहीत आणि दोघांनी बराच काळ एकत्र घालवला. दोघे ५५ वर्षे एकत्र राहिले आणि गेल्या वर्षी दिलीप कुमार यांचे निधन झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-