सायरा बानो यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या ग्लॅमरचीच रंगली होती चर्चा, अभिनेत्रीने दिले ‘असे’ प्रत्युत्तर


सायरा बानो (Saira Bano) या ६०च्या दशकातील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री मानल्या जातात. नजाकत-नफसातमध्ये वाढलेल्या सायरा यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्यांना ग्लॅमरस बाहुली म्हटले जायचे. सायरा यांची आई देखील ३० च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री मानली जात होती. लंडनच्या शाळेत शिकणाऱ्या सायरा अतिशय नाजूक आणि मोहक बाहुलीसारख्या दिसायच्या. परदेशी वातावरणात राहिल्यामुळे त्या बिंधास्त होत्या. एकेकाळी सुबोध मुखर्जीच्या ‘जंगली’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री सायरा यांची निरागसता आणि सौंदर्य रुपेरी पडद्यावर आणि अनेक चित्रपट मासिकांच्या मुखपृष्ठांवर दिसू लागले. तेव्हा सायरा यांच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या.

१९७०-१९७६ मधील सायरा बानो यांचे थ्रोबॅक फोटो
‘जंगली’, ‘एप्रिल फूल’, ‘पडोसन’, ‘झुक गया आसमान’, ‘पूरब पश्चिम’, ‘आदमी और इंसान’, ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्यासोबतच सायरा यांनी शानदार अभिनयही केला. सायरा यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणी  इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सायरा यांच्या अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस थ्रोबॅक फोटोंचा कोलाज शेअर करण्यात आला आहे. या ब्लॅक ऍंड व्हाइट फोटोंमध्ये एक १९७० मधला आहे आणि दुसरा १९७६ मधला आहे. सायरा यांच्या दोन्ही फोटोंमध्ये ६ वर्षांचा फरक आहे. पण दोन्हीही ग्लॅमरने भरलेले दिसत आहे. (saira banu famous glamourous actress during 60s read throwback story)

सायरा बानो यांच्या ग्लॅमरची होती चर्चा
सायरा बानो या १९७१ ते १९७६ पर्यंत चौथी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मानल्या जात होत्या. स्टारडस्ट या फिल्म मॅगझिनने सायराला एका मुलाखतीत विचारले की, तुमच्या टॅलेंटपेक्षा ग्लॅमरवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समीक्षकांना तुम्हाला काय उत्तर द्यायचे आहे. या प्रश्नावर सायरा बानू यांनी अतिशय मनोरंजक आणि समर्पक उत्तर दिले.

सायरा म्हणाल्या होत्या की, “कदाचित ते बरोबर असतील, पण काय फरक पडतो. मी आहे, त्यांना ते आवडेल किंवा नाही. हे लक्षात ठेवा की, हेच महान स्टार मधुबालाला देखील म्हटले होते की, ती मर्लिन मनरोची कॉपी करते. अशा कंपनीत मी आनंदी आहे.”

मधुबाला आणि मर्लिन मनरो यांच्यात होते साम्य
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री मधुबालाची तुलना हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोशी केली जात होती. मर्लिन देखील तिच्या काळातील एक सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि तिचे वैयक्तिक जीवन देखील समस्यांनी भरलेले होते.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!