हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत काही दिवसांपूर्वी खालावली होती. अलीकडेच सायरा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्येत बिघडल्याने सायरा यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर, प्रथमच अभिनेत्री दिवंगत अभिनेते दिलीप यांच्या नवीन बंगल्याच्या बांधकामामध्ये दिसली. घटनास्थळी पोहोचलेल्या सायरा यांनी हातात दिलीप कुमारांची फोटो फ्रेम धरून पॅपराजींना फोटोसाठी पोझ दिली.
सायरा यांच्यासोबत डॉक्टर होते, जे त्यांना चालत जात असताना मदत करत होते. रविवारी (५ सप्टेंबर) त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, सायरा या प्रथमच वांद्रे येथे सुरू असलेल्या नवीन बंगल्याला भेट देण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. या निमित्ताने सायरा यांनी सलवार आणि कुर्ता घातलेला दिसला. तसेच डोक्यावर त्यांनी दुपट्टा घातला होता. त्यांनी आपला चेहरा मास्कने झाकलेला होता.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सायरा बानू, त्यांच्या स्टाफच्या मदतीने अत्यंत हळूहळू चालत गाडीजवळ पोहोचली. त्यांनी डोळ्यांवर काळ्या रंगाचे गॉगल घातलेले दिसले. त्यांनी घटनास्थळी आल्यावर पॅपराजींना हात हालवून शुभेच्छा दिल्या. सायरा यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करुन चाहत्यांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.
वयाच्या ९८व्या वर्षी दिलीप कुमार यांचे दीर्घ आजाराने ७ जुलै रोजी निधन झाले. तेव्हापासून सायरा यांना खूप एकटेपणा जाणवू लागला. या दोघांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय जोडी मानली जाते. या दोन्ही दिग्गज कलाकारांनी १९६६ मध्ये लग्न केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, दिलीप कुमार यांनी करोडो रुपयांची संपत्ती मागे सोडली आहे, ज्याची देखभाल सायरा या करतात. त्यांची ६२७ कोटींची प्रॉपर्टी आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’