Wednesday, February 18, 2026
Home मराठी लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये परश्या दिसतोय एकदम झक्कास; फोटो शेअर करत म्हणाला, ‘बॅक टू…’

लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये परश्या दिसतोय एकदम झक्कास; फोटो शेअर करत म्हणाला, ‘बॅक टू…’

‘सैराट झालं जी’, असं म्हणत महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आकाश ठोसर म्हणजेच सर्वांचा लाडका परश्या होय. ‘सैराट’ या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता अनेक प्रोजेक्टमधून समोर आला आहे. केवळ मराठीतच नाही, तर त्याने हिंदी वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. एवढ्यातच मर्यादित न राहता त्याने अनेक मोठ्या जाहिरातीत काम केले आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे.

आकाशने चित्रपटसृष्टीत आल्यावर खूप कमी कालावधीत त्याची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आकाशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Sairat fame Akash thosar’s photo viral on social media)

आकाशने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो खूपच हँडसम आणि चार्मिंग यंग मॅन दिसत आहे. आधीपासूनच फिटनेस प्रेमी असलेला आकाश या फोटोमध्ये एकदम फिट दिसत आहे. त्याने लाल रंगाचा टी- शर्ट आणि पँट परिधान केली आहे. तसेच त्याने गॉगलही घातला आहे. त्याच्या केसांची स्टाईल देखील काहीशी वेगळी दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत तो मोबाईलमध्ये बघताना दिसत आहे. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “बॅक टू दिस लूक.” त्याच्या या फोटोला प्रेक्षक खूप पसंती दर्शवत आहेत.

आकाश ठोसरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2016 रोजी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून त्याच्या चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. या एकाच चित्रपटाने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. या नंतर त्याने ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘झुंड’, ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा