[rank_math_breadcrumb]

‘सैराट’मधील लंगड्याला मिळाली गर्लफ्रेंड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मराठीमध्ये असे फार कमी चित्रपट येतात. जे कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. आणि त्यातीलच एक चित्रपट म्हणजे सैराट. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत असलेला सैराट या चित्रपट खूप गाजला होता. या दोन कलाकारांसोबत पर्शाचा मित्र लंगड्या नावाची भूमिका करणारा अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) देखील चांगला प्रसिद्ध झाला होता. यानंतर तानाजीने काही चित्रपटांमध्ये काम देखील केले. त्याचप्रमाणे तो सोशल मीडियावर देखील चांगलाच चर्चेत असतो. आता देखील तानाजी त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आलेला आहे.

तानाजी गळगुंडे याने instagram वर एक स्टोरी रीपोस्ट केली आहे. ही स्टोरी मुळतः प्रतीक्षा शेट्टी नावाच्या मुलीने पोस्ट केली होतीम या फोटोमध्ये तानाजी आणि प्रतीक्षा दोघेही दिसत आहेत. हा फोटो शेअर करून तिने नवीन वर्षात प्रवेश असे कॅप्शन दिलेले आहे. आणि आता तीच त्याची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा देखील रंगलेली आहे.

प्रतीक्षा आणि तानाजी या दोघांनी वेरूळमधील काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले होते. त्या ठिकाणचाच हा फोटो आहे. प्रतीक्षा शेट्टी होममेड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. तसेच ती कपड्यांच्या ब्रँड साठी देखील मॉडलिंग आणि फोटोशूट करते, असे तिच्या इंस्टाग्रामवर दिसत आहे. पाच ते सहा वर्षापासून तो एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असे तानाजीने एका मुलाखतीत सांगितले होते. आता त्याची इंस्टाग्राम स्टोरी पाहून प्रतीक्षा त्याची गर्लफ्रेंड असावी असे सगळेजण अंदाज लावत आहे.

actor tanaji galgunde with girlfriend

या मुलाखतीमध्ये जाती व्यवस्थेवर भाष्य करताना तानाजीने स्वतःचे कारण दिले होते. तो म्हणाला की, “माझी गर्लफ्रेंड वेगळ्या जातीतील आहे. दोघेही वेगळ्या जातीचे आहोत. मी जातिवाद मानत नाही. मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलो आहे. पाच ते सहा वर्ष झाले आहे पण मी घरी काही सांगितलं नाही .आम्ही दोघेही पुण्यात होतो आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना हे पटणार नव्हतं? असं देखील त्याने सांगितले. आता त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर पाहून चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बिग बॉस फेम अभिनेत्री योगिता चव्हाणचे साऊथ इंडियन फोटोशूट; सोशल मीडियावर होतीये वाहवा
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार