‘सैयारा’ (Saiyaara) चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केलीये. आता तर हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्येही पोहोचला आहे. चला बघूया, आत्तापर्यंत किती कमावलंय!
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी पहिल्याच चित्रपटात धुमाकूळ घातलाय! चित्रपट तुफान कमाई करत असून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. प्रेक्षक पाहून भावुक झालेत, सिनेमागृहामधून त्यांचे इमोशनल व्हिडीओही समोर येत आहेत. फक्त ४ दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आणि बरेच रेकॉर्ड्सही मोडलेत!
Sacnilkच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पाचव्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत 21.78 कोटी रुपये कमावले आहेत. अजून रात्रीचे शो बाकी आहेत,आणि ते सध्या चांगलं चाललेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 129.03 कोटींवर गेलं आहे. हे आकडे अजून थोडेफार बदलू शकतात. विशेष म्हणजे, या चित्रपटानं सलमान खानच्या ‘सिकंदर’चं लाइफटाइम कलेक्शन (110.1 कोटी) आणि शाहरुख खानच्या ‘डंकी’चं पाच दिवसांचं कलेक्शन (128 कोटी) दोन्ही मागे टाकलं आहे. या चित्रपटानं अक्षय कुमारच्या ‘केसरी 2’च्या एकूण भारतातल्या कमाईलाही मागे टाकलं आहे.
आणि एवढंच नाही, तर आलिया भट्ट-वरुण धवनचा पहिला चित्रपटा ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ (70 कोटी) आणि जान्हवी कपूरचा ‘धडक’ (73 कोटी) ह्यांनाही हा चित्रपटा कमाईच्या बाबतीत मागे सोडून दिलं आहे. हा चित्रपटा मोहित सूरीने दिग्दर्शित केली आहे. फक्त 60 कोटी खर्चून बनवलेली हा चित्रपटा त्याच्या करिअरमधली सगळ्यात मोठी ओपनिंग ठरली आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच 4 दिवसांत ‘सैयारा’ने 100 कोटींचा आकडा पार करून 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेली पहिली रोमँटिक फिल्म बनली आहे. पहऱ्या दिवशी चित्रपटाने 21.5 कोटींची कमाई केली, दुसऱ्या दिवशी 26 कोटी, तिसऱ्या दिवशी तब्बल 35.75 कोटी, आणि चौथ्या दिवशी 23.5 कोटी कमावले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
विद्या बालनचा खुलासा – “इंटीमेट सीनच्या वेळी तो चायनीज खाऊन आला होता, ब्रशही केला नव्हता!”