सैयारा (Saiyara) हा सिनेमा २०२५ मध्ये रिलीझ झालेला ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने खूप जास्त कमाई केली. या एक म्यूजिकल रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमात अहान पांडे आणि अनित पद्डा मुख्य भूमिकेत होते. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, हा सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हा सिनेमा आता पुन्हा एकदा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे, आणि या व्हॅलेंटाईन वीक दरम्यान हा सिनेमा पूण हा प्रदर्शित होईल. “सैयारा” चे निर्माते यशराज फिल्म्सने अद्याप अधिकृतपणे पुन्हा प्रदर्शित होण्याची घोषणा केलेली नाही, परंतु चित्रपटाच्या शोच्या वेळा BookMyShow वर दिसल्या आहेत. यावरून स्पष्ट होते की “सैयारा” व्हॅलेंटाईन वीक दरम्यान मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होईल. हा चित्रपट मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि पुणे येथील चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाईल.
“सैयारा” हा चित्रपट गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड हिट ठरला. या रोमँटिक ड्रामाने जगभरात अंदाजे ₹५७७ कोटींची कमाई केली. या चित्रपटातील दोन मुख्य कलाकार, अहान पांडे आणि अनित पद्डा, एका रात्रीत स्टार बनले. “सैयारा” चित्रपटाने अहान पांडेचा बॉलिवूडमध्ये पदार्पण केला, तर अनित पद्डा यांनी या चित्रपटाद्वारे मुख्य भूमिकेत पदार्पण केले. ती यापूर्वी काजोलच्या “सलाम वेंकी” चित्रपटात दिसली होती.
“सैयारा” हा चित्रपट क्रिश नावाच्या एका संघर्षशील संगीतकाराची कथा सांगतो, जो एक महत्त्वाकांक्षी पत्रकार आणि कवी वाणी बत्रा हिच्या प्रेमात पडतो. त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येतात. या आव्हानांना ते कसे तोंड देतात हा चित्रपटाचा गाभा आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये मुख्य कलाकारांच्या केमिस्ट्रीचे विशेष कौतुक झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










