Friday, August 1, 2025
Home कॅलेंडर तब्बल १७ मिनीटांच्या साक्षी तंवर-राम कपूरच्या ‘त्या’ इंटिमेट सीनमुळे प्रेक्षकांसह हादरली होती टेलिव्हीज इंडस्ट्री

तब्बल १७ मिनीटांच्या साक्षी तंवर-राम कपूरच्या ‘त्या’ इंटिमेट सीनमुळे प्रेक्षकांसह हादरली होती टेलिव्हीज इंडस्ट्री

आज टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री साक्षी तंवरचा ४८ वा वाढदिवस. १३ जानेवारी १९७३ रोजी राजस्थानच्या अलवर ठिकाणी साक्षीचा जन्म झाला. दिल्लीच्या ‘लेडी श्री राम’ कॉलेज’ मधून साक्षीने पदवी संपादन केली. त्यानंतर तिने अभिनयात काम करण्यासाठी मुंबई गाठले. साक्षीला पहिला ब्रेक मिळाला तो दूरदर्शनवर ‘अलबेला सूर मेला’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा. त्यानंतर एकताची नजर तिच्यावर पडली आणि एकताने तिला तिची मालिका ऑफर केली.

साक्षीने २००० साली एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. २००८ पर्यंत चालणाऱ्या या शोने साक्षीला घराघरात ‘पार्वती’ ही ओळख मिळवून दिली. या मालिकेमुळे साक्षीला जबदस्त प्रसिद्धी आणि लोकप्रिय मिळाली.

‘कहानी घर घर की मालिकेच्या समाप्तीनंतर साक्षी ‘कहानी हमारे महाभारत की’, ‘कौन बनेगा करोड़पती’, ‘बालिका वधू’ आणि ‘क्राइम पेट्रोल २’ अशा अनेक कार्यक्रमांचा मर्यादित काळासाठी भाग होती. त्यानंतर २०११ साली पुन्हा एकता कपूरने तिच्या आगामी ‘बड़े अच्छे लगते हैं’ मालिकेसाठी साक्षीची निवड केली. साक्षी आणि अभिनेता राम कपूर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली.

याच मालिकेतील एका भागात साक्षी आणि राम कपूर यांच्यात एक इंटिमेट सीन चित्रित करण्यात आला होता. १७ मिनिटांना एवढा मोठा असलेला हा सीन तेव्हा खूप चर्चेचा विषय बनला होता. या सीनवरून मालिकेच्या संपूर्ण टीमला मोठ्या विवादाला सामोरे जावे लागले होते.

साल २०१६ हे साक्षीच्या आयुष्यातील आणि करियरमधील सर्वात महत्वाचे वर्ष ठरले. याच वर्षी साक्षीने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानसोबत ‘दंगल’ या चित्रपटात काम केले. या सिनेमात तिने आमिर खानची पत्नी दया कौर ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी मल्लिका शेरावतीने देखील ऑडिशन दिले होते. मात्र त्यात साक्षीने बाजी मारत ही भूमिका मिळवली.

यासोबतच साक्षीने करले तू भी मोहब्बत, द फाइनल कॉल आणि मिशन ओवर मार्स अशा वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. शिवाय साक्षी एपिक चॅनेलवरच्या ‘रसोई की थाली’ या कार्यक्रमातही दिसली होती. साक्षीच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर साक्षी अजूनही अविवाहित आहे. ऑक्टोबर २०१८ साली तिने एका ८ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

साक्षीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आणि या अस्थिर क्षेत्रात स्वतःचे स्थळ बळकट केले आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे देखील वाचा