Monday, July 1, 2024

ईदनिमित्त सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून जमावाला लाठीचार्ज

गुरुवारी ईदच्या मुहूर्तावर सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान यांच्या घराबाहेर चाहत्यांनी त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. आता सलमानच्या घराबाहेरचा व्हिडिओ समोर आला आहे. वांद्रे येथील त्याच्या घराबाहेर सलमानचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खानच्या मुंबईतील घरी वेगवेगळ्या शहरातील चाहते रांगेत उभे होते. त्याला पाहण्यासाठी चाहते खूप वेळ थांबले होते. त्याची एक झलक पाहण्यासाठी अभिनेत्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. चोख बंदोबस्त असतानाही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना झगडावे लागले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी लाठीचार्जही केला.

वांद्रे येथून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पोलिस घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांवर लाठ्या मारताना दिसत आहेत. या गोंधळात काही लोक चेंगराचेंगरी होऊन जमिनीवर पडले. मात्र, पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणून वाहतुकीसाठी मार्ग खुला केला. ईदच्या मुहूर्तावर सलमानने त्याच्या चाहत्यांना आधीच एक खास भेट दिली आहे, ती म्हणजे त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा.

सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी ईद स्पेशल करण्याची एकही संधी सोडत नाही. सलमानने एआर मुरुगादास दिग्दर्शित सिकंदर या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. इंस्टाग्रामवर चित्रपटाचे शीर्षक सांगताना सलमानने लिहिले की, ‘या ईद बडे मियाँ छोटे मियाँ और मैदान को देखो आणि पुढच्या ईदवर येऊन सिकंदरला भेटा. सर्वांना ईदच्या शुभेच्छा. या अपडेटसह सलमानने चाहत्यांना पुन्हा एकदा ईदची मोठी भेट दिली आहे. साजिद नाडियादवाला द्वारे समर्थित आणि मुरुगादास दिग्दर्शित हा चित्रपट 2025 च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुंबूल तौकीरच्या वडिलांनी ऑनलाइन ट्रोल्सविरोधात दाखल केली एफआयआर, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
लग्नामुळे अंकिताने नाकारला होता भन्साळींचा हा मेगा चित्रपट, मुलाखतीत केला खुलासा

हे देखील वाचा