Wednesday, July 3, 2024

द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

लवकरच सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा ‘अंतिम: द फाइनल ट्रूथ’ प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सिनेमा खूप लाइमलाइट मिळवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर पाहून सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. या साईनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन चालू आहे. चित्रपटगृह उघडल्यानंतर सलमानचा प्रदर्शित होणार हा पहिलाच सिनेमा असणार आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमान खान रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये पोहचला. त्याच्यासोबत अभिनेता आयुष शर्मा देखील होता. यावेळी सलमान, रणवीर आणि आयुष यांनी सेटवर खूप धमाल केली. त्यांच्या या धमालीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. १४ नोव्हेंबरच्या बालदिनाचे मुहूर्त साधत हा भाग प्रदर्शित केला जाणार आहे. बालदिन असल्याने अनेक लहान मुलं हा शोच्या सेटवर आले होते.

भागाच्या सुरूवातीला एका लहान मुलांच्या ग्रुपने सलमानसमोर डान्स सादर केला. या ग्रुपने सलमान खानच्या ‘हुड हुड दबंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी सलमान या मुलांसोबत लहान झालेला दिसला. डान्सग्रुपमधील एका मुलीच्या डान्सवर सलमान खूपच इंप्रेस झाला होता. त्याने या मुलीसोबत डान्स देखील केला. इतकेच काय तर सलमानने या लहानमुलांना त्याच्या पाठीवर बसवून सेट देखील फिरवला.

सलमानचा हा अंदाज सर्वांचं आवडत असून यातून पुन्हा एकदा सलमानचे लहान मुलांवर असलेले प्रेम व्यक्त होत आहे. रणवीरची एनर्जी आणि सलमानची मस्ती शोच्या या भागाला नक्कीच चार चांद लावेल यात शंका नाही. सलमान ‘अंतिम: द फाइनल ट्रूथ’ सिनेमात अभिनय करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून, सलमानसोबतच यात आयुष शर्मा आणि महिमा मकवाना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा