Monday, February 26, 2024

तर ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’, रंजक आहे एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी

‘शोले’ चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांच्या कारकिर्दीसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. तसेच दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. शोलेमध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत दिसले होते. तर दुसरीकडे अमजद खान नकारात्मक भूमिकेत होते. अमजद खान यांचे ‘गब्बर’ हे पात्र आजवर लोकांच्या मनात आहे. अमजद खान हे पहिले अभिनेते होते ज्यांनी नकारात्मक भूमिका करूनही जाहिराती केल्या होत्या. कारण तेव्हा फक्त नायकच जाहिरात करत असत. शनिवारी (12 नोव्हेंबर) अमजद खान यांचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने जाणून घेऊयात अमजद खान कसे बनले गब्बर…

स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी प्रथम संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांना कास्ट केले होते. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर या दोन्ही कलाकारांना गब्बरचे पात्र जास्त आवडले होते. या दोन्ही कलाकारांनी गब्बरची भूमिका साकारण्याची इच्छा दर्शविली होती. म्हणून त्यावेळी चित्रपटासाठी गब्बरची निवड झाली नव्हती. (bollywood making of evergreen movie sholay is very intertesting here s full info about the)

रमेश शिप्पी यांनी संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही हे स्पष्ट केले की, चित्रपटाचा गब्बर त्यांच्या दृष्टीने इतर कोणी आहे. डॅनी त्यावेळी अव्वल खलनायक म्हणून परिचित होते. गब्बरची ही भूमिका त्यांना ऑफर करण्यात आली होती. थोड्या काळानंतर डॅनी यांनी तारखांच्या समस्येचे कारण सांगून, ही भूमिका करण्यास नकार दिला होता.

‘शोले’ चित्रपटासाठी गब्बरचा शोध पुन्हा एकदा सुरू झाला. कोणीतरी रमेश सिप्पी यांना अमजद खान यांचे नाव सुचवले. त्यावेळी अमजद हे चित्रपटांमध्ये सक्रिय झाले नव्हते. अमजद यांनी ही भूमिका स्वीकारली. अशाप्रकारे, अमजद गब्बरसाठी निवडले गेले होते, हे कायमचे लक्षात राहण्यासारखे पात्र आहे.

बसंती निवडण्यात कोणतीही विशेष समस्या आली नव्हती. हेमा मालिनी यांना या भूमिकेसाठी घेणार असल्याचे रमेश सिप्पी यांनी आधीच मनापासून ठरवले होते. हेमा यांनीही यास मान्य केले, तर अमिताभ यांना जय नावाचे पात्र दिले गेले. आता वीरू पात्रासाठी शोध घेणे सुरू होते. या भूमिकेसाठी धर्मेंद्र यांच्याशी बोलण्यात आले. पटकथा ऐकल्यानंतर धर्मेंद्र यांनी वीरूऐवजी ठाकूरची भूमिका पसंत केली. ठाकूर यांच्या भूमिकेसाठी संजीव कुमार अंतिम ठरले होते. धर्मेंद्र ठाम होते की, त्यांना ठाकूरची भूमिका साकारायची आहे.

रमेश सिप्पी म्हणाले की, जर तुम्हाला ठाकूरची भूमिका दिली गेली, तर वीरूची भूमिका संजीव कुमार करतील. हा नवीन प्रस्ताव ऐकल्यावर धर्मेंद्र यांनी शांतपणे वीरूची भूमिका साकारण्यास मान्य केले. धर्मेंद्र यांना निश्चित करताच चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. यातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम करत या चित्रपटाला अशा एका प्रगतीच्या उंचीवर नेऊन ठेवले की, प्रेक्षक आजही ‘शोले’ चित्रपटाचे चाहते आहेत.

हे देखील वाचा