महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम : द फायनल ट्रु थ’ या चित्रपटातील ‘चिंगारी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘चिंगारी’ हे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती सलमान खानने सर्वात आधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. या गाण्याला सुनिधी चौहानने आवाज दिला आहे. तर हितेश मोदक यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. त्यांचे हे गाणे जोरदार व्हायरल होत आहे.
‘चिंगारी’ गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती सलमान खानने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. या चित्रपटातील तीन गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. या तिन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच चित्रपटातील हे चौथे गाणे सर्वत्र धमाल करताना दिसत आहे. (Salman Khan and ayush Sharma starrer antim film chingari song out)
#Chingari Song Out Now!https://t.co/EiLJrktBAX#AayushSharma @MahimaMakwana_ @Iamwaluscha @manjrekarmahesh @SKFilmsOfficial @ZeeStudios_ #HiteshModak @vaibhavjoshee @SunidhiChauhan5 @KrutiMahesh @ZeeMusicCompany @ZeeCinema @Zee5India @Chingari_IN
— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 12, 2021
या गाण्याचे बोल सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. गाण्यात लावणी स्टाईल दिसत आहे. त्यामुळे गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. खास करून तरुणांना हे गाणे खूप आवडले आहे. ‘चिंगारी’ गाण्यात वलुचा डिसुझा महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये लावणी करताना दिसत आहे. गाण्याचे कोरीओग्राफर कृती महेश हे आहेत, तर वैभव जोशी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.
या चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’, ‘मेरे भाई का बर्थ डे’, आणि ‘होने लगा’ ही गाणी प्रदर्शित झाली आहे. या तिन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे. मराठीमध्ये या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची कहाणी एका सत्यघटनेवर आधारित आहे. आता हा चित्रपट हिंदीमध्ये काम कमाल करणार आहे, हे पाहण्यास सगळे उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…