Tuesday, May 21, 2024

सलमानच्या ‘टायगर 3’ची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम; चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती? वाचा

सलमान खान स्टारर ‘टायगर 3‘ हा 2023 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट होता. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची सुरुवात खूपच धमाकेदार झाली. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 44.5 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. यानंतरही या चित्रपटाने मोठी कमाई केली मात्र बुधवारपासून सलमान खान आणि कतरिना कैफच्या ‘टायगर 3‘च्या कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. जाणून घेऊया चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवारी किती कमाई केली?

‘टायगर 3’ ( Tiger 3 )या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 57.50कोटी आणि तिसऱ्या दिवशी 42.50कोटींची कमाई करून या चित्रपटाने तीन दिवसांतच 104 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी मात्र या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आणि केवळ 22 कोटींची कमाई झाली. तर पाचव्या दिवशी ही कमाई आणखी घटून केवळ 18.50 कोटींवर पोहोचली.

या पाच दिवसांच्या कमाईच्या आधारे चित्रपटाने भारतात 190 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 4 दिवसांत 271,50 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधूनच जास्तीत जास्त कमाई झाली आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाच्या कमाईत आठवड्याच्या शेवटी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’नंतर ‘टायगर 3’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 या आठवड्यात हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत. आता शनिवार आणि रविवारच्या सुटीत चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे. ‘टाइगर 3’ या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाशमी, रेवती आणि कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. (Salman Khan and Katrina Kaif much-loved film Tiger 3 earned so many crores)

आधिक वाचा-
सुशांत सिंग राजपूतवरील चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, अभिनेत्याच्या वडिलांनी केली याचिका दाखल
सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोवर सईची हटके कमेंट; म्हणाली, ‘मॅडम तुमच…’

हे देखील वाचा