सलमान खान आणि राणी मुखर्जी यांची जोडी नव्वदच्या दशकातील हिट जोडी मानली जाते. अनेक वर्षांपासून ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. हे दोघे जेव्हा-जेव्हा एकत्र येतात, तेव्हा पडद्यावर धमाल करतात. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री नेहमीच भावते. विशेष म्हणजे, त्यांची रोमँटिक गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात.
दुसरीकडे, आता अलीकडेच राणी तिच्या आगामी ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस १५’ च्या सेटवर पोहोचली. शो दरम्यान तिने सलमान खानसोबत खूप धमाल केली. एवढेच नाही, तर ‘हॅलो ब्रदर’मधील ‘तेरी चुनरिया दिल ले गई’ या हिट गाण्यावर दोघांनी धमाकेदार डान्सही केला. दोघांच्या धमाकेदार केमिस्ट्रीने पडद्यावर पुन्हा एकदा जादू केलेली पाहायला मिळाली. (salman khan and rani mukerji dance on teri chunariya song video viral)
सलमान खान आणि राणी मुखर्जीचा डान्स व्हिडिओ, कलर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. बऱ्याच वर्षांनंतर अखेर ही जोडी छोट्या पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळाली. या दोघांनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘हॅलो ब्रदर’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘बाबूल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या जोडीने आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ‘बिग बॉस १५’चा हा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राणी मुखर्जीच्या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात तिची जोडी सैफ अली खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात राणी आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे, आता याच्या सिक्वेलमध्ये दोन-दोन बंटी आणि बबली दिसणार आहेत, जे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. वरुण शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, हा त्याचा पहिला चित्रपट असेल. आदित्य चोप्रा या चित्रपटाचे निर्माते असून हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे
-अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल