Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड सलमान खान अन् सोनाक्षी सिन्हाने गुपचूप उरकलं लग्न? फोटो आला समोर

सलमान खान अन् सोनाक्षी सिन्हाने गुपचूप उरकलं लग्न? फोटो आला समोर

अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. सलमानचे चाहते त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. आता सलमानच्या लग्नाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमानने सोनाक्षी सिन्हासोबत (Sonakshi Sinha) लग्न केल्याचे बोलले जात आहे. या फोटोमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा दिसत आहेत. त्याचवेळी सोनाक्षीच्या भांगेत सिंदूर दिसत आहे. चला सलमानच्या या लग्नाच्या फोटोचे सत्य जाणून घेऊया.

Photo Courtesy Social Media

सलमान आणि सोनाक्षीचा हा लग्नाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा फोटो फोटोशॉप करण्यात आला आहे. सलमान आणि सोनाक्षीचे लग्न झालेले नाही. सलमान खान स्वत:ला सिंगल असल्याचे सांगत आहे, पण तो अनेकदा त्याची मैत्रिण युलिया वंतूरसोबत दिसतो. त्यामुळे सलमान आणि युलिया रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. (salman khan and sonakshi sinha wedding photos going viral what is truth behind this)

त्याचबरोबर सोनाक्षीचे नाव झहीर इक्बालसोबत जोडले जात आहे. मात्र, सोनाक्षीने झहीरसोबतच्या नात्याला नकार दिला आहे. दबंग गर्लने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये नाही. झहीर हा तिचा फक्त चांगला मित्र आहे. मात्र दोघंही दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कोणत्यातरी चाहत्याने हा प्रकार केला असावा.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो नुकताच दुबईला गेला होता. जिथे ‘द बँग द टूर-रीलोडेड’ मध्ये सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक स्टार्सने परफॉर्म केले होते. या इव्हेंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र, आता शो पूर्ण करून सलमान खान मुंबईत परतला आहे. काल रात्री अभिनेता मुंबई विमानतळावर दिसला.

हेही वाचा – 

हे देखील वाचा