Friday, July 5, 2024

प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि चित्रपटगृह उघडण्याची घोषणा होताच, हिंदी चित्रपट जगतात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक रखडलेले चित्रपट, ट्रेलर, प्रदर्शित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कुणी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर कुणी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. याचवेळी ‘भाईजान’ म्हणजेच सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेता आयुष शर्माचा ‘अंतिम’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. सलमानने नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सोबतच चित्रपटाचा धमाकेदार टिझर सुद्धा प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये सलमान खान पगडीमध्ये दिसून येत असून, आयुष शर्मा इमोशनल लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

नुकताच सलमान खानने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या बहुचर्चित ‘अंतिम’ चित्रपटाचा टिझर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओची सुरुवात सलमान खानच्या फोटोपासून होते, जो लहान लहान होत आयुष शर्माच्या डोळ्यापर्यंत जातो. टिझरमध्ये आयुषचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. सोबतच त्याने हातात बंदूक घेतल्याचेही दिसत आहे.

पोस्ट केलेल्या या व्हिडिओसोबत सलमानने चित्रपटाची तारीखही जाहीर केली आहे. त्याने ‘अंतिम’ चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती दिली आहे. चित्रपटाचा पोस्टर आधीच समोर आला असून आयुष आणि सलमान एकमेकांसमोर उभे असल्याचे दिसत आहे. ज्यावरून चित्रपटात सलमान आणि आयुषमधील जोरदार संघर्ष पाहायला मिळणार असल्याची कल्पना येत आहे.

दरम्यान दीर्घ प्रतीक्षेनंतर सलमान आपल्या चाहत्यांसमोर येत असल्याने चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. सलमान सध्या ‘बिग बॉस 15’मध्ये दिसून येत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा