Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड दबंगगिरी करणाऱ्या सलमान खानला चक्क त्याच्याच नोकराने दिला होता चोप, रंजक आहे ‘तो’ किस्सा

दबंगगिरी करणाऱ्या सलमान खानला चक्क त्याच्याच नोकराने दिला होता चोप, रंजक आहे ‘तो’ किस्सा

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून सलमान खानचे (Salman Khan) नाव घेतले जाते. चित्रपट जगतात भाईजानची डॅशिंग आणि दमदार अभिनेता म्हणून ओळख आहे. प्रत्येक चित्रपटात सलमान खानच्या दमदार अभिनयाची आणि लूकची चर्चा होत असते. भाईजानच्या चित्रपटांइतकीच त्याच्या रागीट स्वभावाचीही नेहमीच चर्चा होत असते. सलमानच्या रागाचा प्रसाद अनेकांना मिळाला आहे. त्यामुळेच सलमान खानची बॉलिवूडवर अघोषित दबंगगिरी नेहमी पाहायला मिळणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये भाई समजल्या जाणाऱ्या सलमान खानला एकदा घरातील नोकरानेच चोप दिला होता. ज्याचा खुलासा खुद्द सलमान खानने केला आहे.

सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र सध्या सलमान खानने कपिल शर्माच्या कार्यक्रमात केलेला एक खुलासा सगळीकडे चर्चेत आला आहे. हा किस्सा सलमान आणि अरबाज खान यांच्या लहानपणीचा आहे. लहानपणी तो खूप मस्तीखोर होता. त्यामुळे नेहमी काहीतरी उचापत्या करण्यात तो आघाडीवर होता.

एकदा त्यांच्या घराला नवीन रंग देण्यात आला होता आणि यावेळी घरात कोणीच नसल्याने सलमान खान आणि अरबाज खान यांच्यात मस्ती चालू होती. यावेळी खेळता खेळता त्यांनी भिंतीवर सगळ्यात उंच लाथ कोण मारतो, हे बघण्याचा कार्यक्रम आरंभला आणि त्यांनी रंग दिलेल्या भिंतीवर लाथा मारण्यास सुरूवात केली. जेव्हा हा प्रकार घरातील नोकराच्या लक्षात आला तेव्हा त्याने सलमान खानच्या कानाखाली लगावली.

जेव्हा सलमान खानचे वडील सलीम खान घरी आले आणि हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर गेला तेव्हा त्यांनी नोकराला बोलावून घेतले आणि सगळे प्रकरण समजले तेव्हा त्यांना सलमान खानचा उद्धटपणा लक्षात आला तेव्हा त्यांनीही सलमान आणि अरबाजला चोप दिला. सलमान खानने सांगितलेला हा किस्सा ऐकूण सगळेच हसायला लागले होते. दरम्यान भाईजानच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा