RRR | अमेरिकेत थांबवला गेला चालू शो, जाणून घ्या प्रेक्षकांना का दाखवला अर्धवट चित्रपट

एसएस राजामौली यांचा बहुचर्चित ‘आरआरआर‘ चित्रपट सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला संपूर्ण जगभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. यामुळेच दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. चित्रपटाला अमेरिकेतही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र अमेरिकेच्या एका चित्रपटगृहात ‘आरआरआर’ चित्रपट अर्ध्यातच बंद केल्याने गोंधळ उडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सध्या जगभरात ‘आरआरआर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अमेरिकेतील एका चित्रपटगृहात ‘आरआरआर’ चित्रपट अर्धाच दाखवून बंद केल्याने गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमागृह अमेरिकेतील प्रसिद्ध सिनेमागृहांपैकी एक आहे. या सिनेमागृहाच्या चालकांना ‘आरआरआर’ चित्रपटाची तीन तासांची मोठी कथा आणि वेळ लक्षात न आल्याने त्यांनी मधेच चित्रपट बंद केला. यावेळी मध्यांतरानंतर चित्रपट सुरू न झाल्याने उपस्थित प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली ज्यामुळे काही काळ गोंधळ उडाल्याचे चित्र उभे राहिले होते.

दरम्यान, ‘आरआरआर’ या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातून आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात क्रांतिकारक अल्लूरी सिताराम आणि कोमाराम भीम यांची कथा दाखवली आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआर ने रामची तर राम चरणने भीमाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी २४० कोटीची कमाई केली आहे. चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post