बॉलिवूडच्या भाईजानचा म्हणजेच सलमान खानचा नुकताच ५५ वा वाढदिवस साजरा केला. सलमानचा ह्यावर्षीचा वाढदिवस हा त्याच्या दरवर्षीच्या वाढदिवसापेक्षा नक्कीच वेगळा होता. कारण ह्यावर्षी भाईजान सोबत भाचीचा देखील पहिला वाढदिवस साजरा झाला.
मागच्यावर्षी सलमान खानच्या बहिणीने अर्पिताने सलमानच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिच्या मुलीला आयतला जन्म दिला. अर्पिता आणि आयुष्य शर्मा यांच्या मुलीचा जन्म सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी झाल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता.
Awww Pic Of The Day… @BeingSalmanKhan With Ayat ???????????????????????????????????????????? #HappyBirthdaySalmanKhan pic.twitter.com/bjtcp5WPmp
— ????Salman_Ki_Deewani???? (@s_shenazKhan) December 27, 2020
आयत ही अर्पिता आणि आयुष्य यांची दुसरी मुलगी आहे. आयत आधी त्यांना आहिल नावाचा मुलगा देखील आहे. अभिनेता आयुष्य शर्मा याने आयतच्या जन्मासाठी २७ डिसेंबर म्हणजेच सलमानच्या वाढदिवसाचीच तारीख का निवडली याबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, ” अर्पिताला डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा किंवा जानेवारीचा पहिला आठवडा अशी तारीख दिली होती. हे आम्ही घरी सांगितल्यावर सलमान भाईने आमच्याकडे ह्या बाळाच्या रूपाने त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट मागितले. म्हणून आम्ही अर्पिताची २७ डिसेंबरला सिझेरीन डिलिव्हरी केली आणि आयत आमच्या आयुष्यात आली. आयत आणि सलमान भाईचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याचा मला सर्वात जास्त फायदा झाला असल्याचे आयुषने सांगितले. कारण दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने दोन दोन पार्टी द्यायचा माझा खर्च वाचला. तसेपण अर्पिताला पार्ट्यांचा जास्त शौक नाही. त्यातही तिने माझा बराच खर्च वाचवला.”
आयत आणि सलमान दोघांचाही वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर साजरा करण्यात आला. अगदी मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हे सेलिब्रेशन झाले. याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यात सलमान, आहिल, सलमा आणि सलीम खान एकत्र केक कापत आहे. यावेळी रितेश जेनेलिया सोबत सलमानचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
यावर्षी कोरोनामुळे सलमानने त्याचा आणि आयतचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. सलमान लवकरच त्याच्या बहू चर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राधे’ सिनेमात दिसणार आहे.










