Saturday, June 29, 2024

‘सलमान खानमुळेच माझी आई…’ म्हणत राखी सावंतच्या भावाने मानले दबंग खानचे आभार

नुकतेच अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे दुःखद निधन झाले. सध्या राखी, तिचे कुटुंब आणि सावंत कुटुंब दुखत आहे. आईला गमवल्यामुळे राखी सावंत पूर्णपणे कोलमडली असून, ती या धक्क्यातून अजून बाहेर आलेली नाही. याकाळात टेलिव्हिजन आणि चित्रपटविश्वतील सर्वच कलाकार तिच्याशी बोलून, भेटून तिचे सांत्वन करत आहे. बॉलिवूडचा दबंग खान असलेल्या सलमान खानने देखील राखीला आई गेल्यानंतर फोन करत दुःख व्यक्त केले. राखीचा भाऊ असलेल्या राकेश सावंत याने याबद्दल खुलासा केला आहे.

राखी सावंतचा भाऊ असलेल्या राकेश सावंतने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “आजारपणामुळे माझी आई खूपच दुःखात आणि त्रासात होती. कॅन्सरमुळे माझ्या आईच्या किडन्या निकामी झाल्या, फुप्फुस देखील निकामी झाले होते. हळू हळू तिचे सर्वच अवयव निकामी झाले. यासोबतच आईला ब्रेनट्युमरचे देखील निदान झाले. आई ऍडमिट असताना तिला हार्ट अटॅक आला आणि तिचे निधन झाले. मला आणि राखीला आईचा हा त्रास अजिबात बघवत नव्हता. तिने खूपच त्रास सहन केला. आता तिला शांतता मिळाली असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

पुढे राकेश सावंत म्हणाला, “मनोरंजनविश्वातील सर्वच कलाकारांनी आम्हाला भेटून, फोन करून आमचे सांत्वन केले. सलमान खानने देखील फोन करून राखीसोबत चर्चा केली. आई आणि राखीला मदत करणारे सर्वच लोकं या कठीण काळात आमच्यासोबत आहे. खासकरून सलमान खान आज सलमान भाईमुळेच माझी आई मागचे तीन वर्ष अजून जिवंत राहिली. त्यानेच आईचे ऑपरेशन केले आणि सर्व खर्च देखील उचलला. सर्वच लोकं माझ्या आईच्या निधनामुळे दुःखात आहे. आईने काही सिनेमांमध्ये काम केले होते, त्यामुळे इंडस्ट्रीमधील सर्वच लोकं आम्हाला सांत्वन पाठवत आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांपासून ते लहान कलाकारांपर्यंत सर्वानी आमची भेट घेतली.”

तत्पूर्वी शनिवारी (२८ जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास राखीची आई जया यांचे निधन झाले. राखीचे रडतानाचे बरेच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा