सध्या अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता भाईजानबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला, तर तो अभिनेता रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) ‘वेद’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. रितेश देशमुख ‘वेद’च्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. तसेच हा एक मराठी चित्रपट आहे.
एका खास भूमिकेत दिसणार सलमान खान
या चित्रपटात सलमान खान एका खास भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर तो एका गाण्यावर आपल्या डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहे. आता सलमान खान आल्यानंतर या चित्रपटावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल लागेल. याआधी सलमान खान २०१४मध्ये आलेल्या रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात स्पेशल अपिअरन्समध्ये दिसला होता. ‘वेद’ व्यतिरिक्त सलमान ‘पठाण’ चित्रपटातही कॅमिओ करताना दिसणार आहे. (salman khan cameo role marathi movie starring these actors)
सलमान खान सध्या पूजा हेगडे (Pooja Hegde), शहनाज गिल (Shehnaaz Gill), पलक तिवारी (Palak Tiwari) आणि इतर टीमसोबत हैदराबादमध्ये ‘कभी ईद कभी दिवाली’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
जिनिलियाही दिसणार मुख्य भूमिकेत
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेद’ या चित्रपटात त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देखील दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलिया डिसूझा दीर्घ काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटात जेनेलियासोबत जिया शंकर मुख्य भूमिकेत आहे. जेनेलिया डिसूझाला पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
रितेश देशमुखचा ‘वेद’ हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता त्याचे पुनरागमन हिट होते की फ्लॉप हे पाहावे लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान या महिन्याच्या अखेरीस त्याच्या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू करणार आहे. गाण्याचे शूटिंग मुंबईत होणार आहे. रितेश देशमुख सध्या सलमान खानसोबत शूटिंगच्या संदर्भात चर्चा करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा