Thursday, April 25, 2024

सलमान खानच्या होस्टिंगला दुर्लक्षित केल्यामुळे रितेश देशमुखवर नाराज झाला दबंग खान, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमध्येही सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणून आयफा पुरस्कार ओळखले जातात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे हे पुरस्कार झाले नव्हते. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहाने हे पुरास्कार अबूधाबीमध्ये संपन्न होणार आहे. २ ते ४ जून पर्यंत आयफा पुरस्कार सोहळा अबूधाबीमध्ये रंगणार असून, या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक नामी सेलेब्स हजेरी लावणार आहेत. २ जून रोजी अबूधाबीमध्ये आयफाची प्रेस कॉन्फरन्स संपन्न झाली. यावेळी सलमान खान, रितेश देशमुख, मनीष पॉल, शाहिद कपूर, टाइगर श्रॉफ, अनन्या पांडे, दिव्या खोसला आदी कलाकार उपस्थित होते.

सध्या सोशल मीडियावर या प्रेस कॉन्फ्रेंसची एक क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. या क्लिपमध्ये सलमान खान रितेश देशमुखवर जरासा नाराज होताना दिसत आहे. आपले होस्टिंग कमी लेखल्यामुळे सलमान रितेशवर नाराज झाला. नक्की झाले काय चला जाणून घेऊया. सर्व तेव्हा घडले जेव्हा रितेशने मनीष पॉलच्या सूत्रसंचलनाचे कौतुक केले. रितेश मनीषला म्हणतो, “मी सांगू इच्छितो की, तुझे होस्टिंग सर्वात बेस्ट आहे. पिरियड.” त्यानंतर लगेच सलमान खान थोडा नाराज होतो.

सलमान खान रितेशकडे बघून इशाऱ्यामध्ये म्हणतो, “माझे काय. मला विसरला का? त्यानंतर रितेश सलमान खान जवळ येतो आणि म्हणतो, “सॉरी चूक झाली मी नंतर करेल.” तेव्हा सलमान म्हणतो, “ते मी स्वतःच विसरलो. मी कधी कधी होस्टिंग करतो. सलमान खानचा हा मजेशीर अंदाज पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. हे सर्व मजाक मस्तीमध्ये चालू होते. यावेळी स्टेजवर हजर असलेले अनेक कलाकार हे सर्व पाहून जोरात हसत देखील होते.

सलमान खानचा हा व्हायरल होणार व्हिडिओ पाहून त्याचे फॅन्स त्याला बेस्ट होस्ट म्हणून सांगताना दिसत आहे. एकाने लिहिले, “सलमान भाई तुझ्याशिवाय चांगले होस्टिंग कोणीच करू शकत नाही.” तर दुसर्याने लिहिले, “किंग ऑफ बॉलिवूड सलमान खान.” या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान आणि शाहिदने आयफाचा Metaverse लोगो देखील प्रदर्शित केला. यावेळी आयफाला अधिक ग्लॅमरचा तडका बॉलिवूडच्या अभिनेत्री देणार असून त्या वेगवेगळ्या धमाकेदार गाण्यांवर परफॉर्मन्स देताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा