बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान (salman khan) त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या ‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोसाठी सतत चर्चेत असतो. पुन्हा एकदा बिग बॉसचा आगामी सीझन चर्चेत आला आहे, अशा परिस्थितीत सलमान खानही चर्चेत येणार आहे. कारण ज्या शोमध्ये स्पर्धक धूम ठोकताना दिसतात, तिथे सलमान खाननेही शोमध्ये भर टाकली तर. सलमान खानने एका मुलाखतीदरम्यान बिग बॉसबद्दल एक इशारा दिला होता. आता याच दरम्यान, सलमान खानच्या फीबाबतही एक नवीन अपडेट समोर आले आहे.
‘बिग बॉस १६’ च्या मंचावर पुन्हा एकदा सलमान खान स्पर्धकांच्या धमाल-मस्तीसह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सलमान खानला बिग बॉस १६ होस्ट करण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचे बोलले जात आहे. समीक्षक आणि ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी दावा केला आहे की, सलमान खान बिग बॉस १६ साठी ८०० कोटी रुपये फी घेणार आहे.
इतकंच नाही तर ८०० कोटींवर हा करार झाल्याचंही ते सांगतात. काही काळापूर्वी माध्यमातील वृत्तानुसार असा दावा करण्यात आला होता की सलमान खानने बिग बॉस १६ साठी १०५० कोटींची मागणी केली आहे. मात्र, आता समोर आलेल्या ताज्या अहवालात हा करार ८०० कोटींमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. बिग बॉस १५ बद्दल बोलायचे झाले तर या सीझनसाठी सलमान खानला ३५० कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु आताची त्यांची फी ऐकून सगळेच अवाक झाले आहेत. बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांचा आवडता शो मध्ये, गेले १५ सीजन सलमान खान हा शो होस्ट करत आहे. त्यांची होस्टिंग देखील त्याच्या चाहत्यांना खूप आवडते.
हेही वाचा-
सोनू सूदकडे एकूण संपत्ती आहे तरी किती? फक्त ५५०० रुपये घेऊन आला होता मुंबईत
अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद