Saturday, July 6, 2024

सलमान खान पडला प्रेमात? मिस्ट्री गर्लच्या गालावर किस करताना दिसला भाईजान

हिंदी चित्रपट क्षेत्राचा सुपरस्टार दबंग सलमान खानच्या प्रत्येक चाहत्याला त्याच्या लग्नाची काळजी लागलेली असते. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेलेला भाईजान आजही सिंगल आहे याचे त्याच्या चाहत्यांना खूपच दुःख होते. पण आता सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोवरून सलमान खान सिंगल नसल्याचेच समजत आहे, काय आहे हे व्हायरल सत्य चला जाणून घेऊ.

नुकताच बिग बॉसच्या 15 व्या पर्वाचा शेवट पाहायला मिळाला. यामध्ये शहनाज गिलने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता सलमान खानने (salman khan) तो सिंगल नसल्याचा खुलासा केला होता. आपल्या या नवीन गर्लफ्रेंडबद्दल मात्र काहीही माहिती न देता भाईजानने फक्त “मी सध्या सिंगल नाही सिंगल झालो तर बरं होईल,” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याच्या या वक्तव्यावर चाहत्यांना ही भाईजानची नवीन गर्लफ्रेंड कोण असा प्रश्न पडला होता. मात्र समोर आलेल्या फोटोमधून या प्रकरणाचा उलगडा होताना दिसत आहे. यामध्ये सलमान खान एका तरुणीसोबत किस करताना दिसत आहे.

या व्हायरल फोटोमधील मुलीचे नाव आहे पायल शेट्टीजी. सलमान खानसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. यामध्ये पहिल्या फोटोत ती सेल्फी काढताना दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोत सलमान खानने तिच्या खांद्यावर हात टाकला आहे. तिसर्‍या फोटोत तर भाईजान चक्क या मुलीला किस करताना दिसत आहे. यामध्ये पायलने या फोटोंना दिलेले कॅप्शनही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये तिने “आयी ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया ओ मेरे करिब है इतक्या भारी मेजवानी साठी धन्यवाद,” असे लिहले आहे.

आता हे फोटो पाहून तुम्हालाही हे भाईजानचं नवीन प्रेम प्रकरणचं आहे असे वाटले असेल पण जरा थांबा. आधी ही पोरगी कोण आहे तिच्याबद्दल जाणून घ्या. ही पायल शेट्टी म्हणजे बिग बॉसच्या 15 व्या पर्वात सहभागी झालेल्या विशाल कोटीयानची गर्लफ्रेंड आहे. बिग बॉस 15 संपल्यानंतर पायल आणि विशालने सलमानची भेट घेतली होती त्याचेच हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

हे फोटो पायलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावर विशालने “आता मला अजय देवगण व्हाव लागेल” अशी भन्नाट कमेंट केली आहे. आता यात विशेष काय असा प्रश्न पडला असेल तर सांगतो सलमान खान आणि अजय देवगणने “हम दिल दे चुके सनम” चित्रपटात काम केले आहे. आणि या चित्रपटाची नायिका होती ऐश्वर्या रॉय आता पुढची कथा तर तुम्हाला माहीतच आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा