Friday, July 5, 2024

सलमान आणि त्याची आई थिरकले एकाच गाण्यावर, चाहते देखील झाले दंग

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा इंडस्ट्रीत कितीही दरारा असला तरी घरी मात्र त्याच रूपांतर लहान मुलामध्ये होतं. सलमान दुनियेला झुकवेल पण आई वाडीलांसमोर त्याची नजर अजूनही खालीच असते. आणि फक्त सलमानचा नाही तर इतर दोन बंधू सोहेल आणि अरबाज देखील असेच आहेत.

सध्या बिग बॉस १४ चं शूटिंग सुरू आहे. गेल्या ९ ते १० वर्षांत बिग बॉस म्हणजे सलमान हे एक समीकरणच झालं आहे. विकेंडच्या वाराला सर्व स्पर्धकांवर अंकुश ठेवताना आपण सलमानला पाहतो. परंतु घरी असल्यावर त्याच सलमान वर घरच्यांचा अंकुश असतो. आणि एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे तो सगळं काही ऐकतो.

त्याचं आणि आई सलमाच असच प्रेमाचं नातं दर्शवणारी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे. या व्हिडिओ मध्ये आपण सलमान आणि त्याची आई सलमा खान या दोघांनाही एकत्र नृत्य करताना पाहू शकतो. हे माय-लेक एका इंग्रजी गाण्यावर घरात सुंदर असा डान्स करत आहेत. हा डान्स करताना आई सलमा सलमानला कवेत घेते आणि सलमान सुद्धा तिला प्रेमाचं घट्ट आलिंगन देतो आणि तरी देखील दोघे डान्स करत आहेतच. हे माय लेकाचं प्रेम पाहून आपले डोळे पाणावले नाही तरच नवल! सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत करोडो लोकांनी या व्हिडिओला पाहिलं आहे.

सध्या सलमान अंतिम या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिनेमामध्ये सलमान एका पंजाबी सरदाराची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. यानंतर सलमानचा बहुप्रतिक्षित सिनेमा राधे च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सोबतच मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमातून देखील सलमान झळकणार आहे. या सिनेमात दिशा पटानी आणि रणदीप हुड्डा यांच्या देखील मुख्य भूमिका असणार आहेत.

हे देखील वाचा