सलमान खान (Salman Khan) आणि वाद हे प्रकरण काही बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. सलमान खानच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते. तितकीच चर्चा त्याच्या वादांची होत असते. सलमान खानचे काळवीट शिकार प्रकरण नेहमीच चर्चेत असते. या प्रकरणात सलमान खानला जिवे मारण्याची धमकीही मिळाली होती, ज्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली होती. आता सलमान खान पुन्हा एका नव्या वादात अडकला आहे. यावेळी सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोमी अली अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी सलमान खानची सर्वाधिक चर्चेत असलेली गर्लफ्रेंड आहे. दोघांचे अफेअर अनेक वर्षे चालले, पण हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले नाही आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर सोमी अली अमेरिकेला निघून गेली.
सोमी आणि सलमानच्या प्रेमकहाणीला आणि ब्रेकअपला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण अभिनेत्री आजही भाईजानला टार्गेट करत आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप करत आहे. आता नुकतेच सोमी अलीने सलमानवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने भाईजानचे वर्णन महिलांना मारहाण करणारी व्यक्ती आणि ‘सेडिस्ट’ असे केले आहे. सोमीने तिच्या इंस्टाग्रामवर ‘मैने प्यार किया’चे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत भाग्यश्री मुख्य भूमिकेत होती.
पोस्टर शेअर करताना सोमी अलीने लिहिले की, “ज्याने महिलांनी मारहाण केली. फक्त माझ्यासोबतच नाही तर अजून बऱ्याच महिलांसोबत त्याने असे केले. त्याची पूजा करणे बंद करा. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, प्रक्षोभक आहे. तुम्हा लोकांना याची कल्पना नाही.” तसे, सोमी अलीने सलमान खानवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही या अभिनेत्रीने भाईजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
सोमी अलीने तिच्या आणि सलमान खानसोबतच्या ब्रेकअपचे कारणही माध्यमांना सांगितले होते. या अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, सलमानने तिची फसवणूक केली होती, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले होते. ऐश्वर्या रायसाठी सलमानने तिची फसवणूक केल्याचे सोमीने सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्री पुन्हा अमेरिकेला गेली.(salman khan ex gf somy ali call salman sadist and a women beater)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फिनालेपूर्वी ‘या’ स्पर्धकाने घेतला शो सोडण्याचा निर्णय, कारण वाचून तुम्ही व्हाल थक्क
बिग ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, ह्रदयविकाराच्या झटक्याने मावळली प्राणज्याेत