Sunday, April 14, 2024

ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, ह्रदयविकाराच्या झटक्याने मावळली प्राणज्याेत

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे वयाच्या 85व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजा बापट यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांसाेबतच इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. बापट यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुषमा, लेक शिल्पा, जावाई गिरीश म्हसकर आणि नातवंडे असा परिवार आहे.

राजा बापट यांनी युनियन बॅंकेत अधिकारीपदावर नाेकरी केली व तिथून निवृत्त हाेताच नाटकात प्रवेश केला.‘यशोदा’, ‘श्रीमंत’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’,या प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. यासाेबत बापट यांनी ‘नवरे सगळे गाढव’, ‘थोरली जाऊ’, ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘झुंज’,’प्रीत तुझी माझी’ या मराठी चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या.

निवृत्तीनंतर अभिनेते दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये विविध उपक्रमांच्या आयोजनात कार्यरत राहिले. त्यांना बासरी व्हायोलिन,हार्मोनियमवादनाचा छंद होता.(veteran actor raja bapat passed away mumbai)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आराेप; म्हणाली, ‘सिगारेटचे चटके देऊन…’

हे देखील वाचा