Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड सलमान खान नंतर आता कुटुंबासह त्याच्या बहिणीच्या नवऱ्यालाही कडक सुरक्षा; काय आहे कारण?

सलमान खान नंतर आता कुटुंबासह त्याच्या बहिणीच्या नवऱ्यालाही कडक सुरक्षा; काय आहे कारण?

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या (salman khan) सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे हा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहते. त्याला मुंबई पोलिसांनी आधीच वाय-प्लस सुरक्षा पुरवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सलमानचे कुटुंब आणि त्याचा म्हणजेच त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा यांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाकडून सलमान खानच्या आयुष शर्मालाही पोलिस संरक्षण देण्यात आली आहे. आता तो जिथे जाईल तिथे त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतील. जर त्याला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर जावे लागले तर त्याला सलमानच्या बुलेटप्रूफ गाडीमधून प्रवास करण्यास सांगितले आहे. सुरक्षेसाठी सलमानला यापूर्वीच त्याचे वैयक्तिक शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.

२०२२ पासून सलमानला गँगस्टर बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, तेव्हापासून मुंबई पोलीस वेळोवेळी त्याच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गँगस्टर बिश्नोईकडून धमक्या देण्यात आल्या होत्या. आता त्याच्या कुटूंबालाही सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमानने बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे. आता याच गाडीतून आयुष शर्माला प्रवास करण्यास सांगितले आहे. दररोज मिळणाऱ्या धमक्यांमुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. या कारणास्तव मुंबई पोलिसांनीही त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे.

आयुषच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘रुस्लान’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. आता चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आयुषच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हिंदी सिनेसृष्टीवर दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह नाराज; म्हणाले, ‘दम नाही…’
12Th Fail फेम विक्रांत मेस्सीने विकी कौशलचे केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाला…

हे देखील वाचा