Monday, July 1, 2024

याला म्हणतात प्रेम! सलमान खानला भेटण्यासाठी ‘या’ पठ्याने सायकलवर पार केले ११०० किमीचे अंतर

कलाकार आणि फॅन्स यांचे नाते आणि प्रेम सर्वश्रुत आहे. आपल्या आवडीच्या कलाकारांच्या फॅन्सचे नवनवीन किस्से अनेकदा आपल्या कानावर पडत असतात. आपल्या आवडत्या कलाकारासाठी फॅन्स काहीही करताना मागचा पुढचा विचार करत नाही. कलाकार देखील फॅन्सचे प्रेम मनापासून स्वीकारतात आणि त्यांचे कौतुक करतात. कधी कधी काही फॅन्स सेलेब्सच्या नजरेत येण्यासाठी चुकीच्या गोष्टी देखील करतात. मात्र सच्चे फॅन आपले प्रेम आपल्या आवडत्या कलाकारापर्यंत पोचवण्यासाठी जंग जंग पछाडतात. असाच एक फॅन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा नवीन फॅन आहे बॉलिवूडच्या दबंग खानचा. या फॅनबद्दल ऐकल्यावर खुद्द सलमान खान देखील त्याचा फॅन बनला. सलमानचा हा फॅन आहे, जबलपूर मध्यप्रदेशचा. या फॅनने सलमान खानला भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा सायकलवर प्रवास करून मुंबई गाठली आणि सलमानची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेव्हा हा फॅन सलमान खानच्या घराबाहेर पोहचला तेव्हा सलमान घरीच होता, त्याने देखील खाली येत या फॅनची भेट घेतली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by STUDENT LINE (@media_grade)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सलमान खानने त्या फॅनसोबत उभे राहून अनेक पोज देखील दिल्या. या फोटोमध्ये आपण पहिले तर लक्षात येईल की सलमानच्या फॅनकडे बीइंग ह्यूमनचीच आयकल आहे. सोशल मीडियावर सलमान खानच्या फॅन पेजवर हे फोटो शेअर करताना लिहिले गेले की, ” जबलपूरच्या राहणार समीर ११०० किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करून त्याच्या आवडत्या सुपरस्टार सलमान खानला भेटण्यासाठी मुंबईमध्ये आला.” हे अंतर समीरने पाच दिवसात पूर्ण केले. या पोस्टवर नेटकाऱ्यानी त्या फॅनचे खूप कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी संगीतबद्ध केलं होतं पहिलं गाणं; तर बराच रंजक होता आर डी बर्मन यांचा जीवनप्रवास
आर.डी बर्मन स्मृतीदिन : …आणि असे बनले आर.डी बर्मन ‘पंचम दा’, वाचा त्यांच्या नावामागचा किस्सा

हे देखील वाचा