Wednesday, October 15, 2025
Home कॅलेंडर वाचून डोक्याला मुंग्या येतील… तब्बल २३० कोटींना विकले गेले ‘या’ चित्रपटाचे सर्वाधिकार; जाणून घ्या

वाचून डोक्याला मुंग्या येतील… तब्बल २३० कोटींना विकले गेले ‘या’ चित्रपटाचे सर्वाधिकार; जाणून घ्या

कोरोनामुळे २०२० यावर्षी सर्व क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला. चित्रपटगृहे बंद राहिल्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबले गेले. त्यात सलमान खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे.

सलमान खानचा हा सिनेमा अजून प्रदर्शित जरी झाला नसला, तरीही या चित्रपटाने २३० कोटी कमावले आहेत. सलमान खानचे मागील काही चित्रपट बघता ही डील योग्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सलमानचे चित्रपट नेहमीच १०० कोटीपेक्षा जास्तीची कमाई करतात. त्यामुळे या सिनेमाचे राइट्स इतक्या रुपयांना विकणे स्वाभाविक आहे.

सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाचे सर्वाधिकार प्रदर्शनाआधीच झी स्टुडिओने २३० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. प्रदर्शनाआधीच या सिनेमाने मोठा नफा मिळवला आहे. प्राप्त माहितीनुसार राधे चित्रपटाचे सॅटेलाइट, थियेटर रिलीज, डिजिटल आणि म्युझिक राइट्स झी स्टुडिओने विकत घेतले आहेत.

Radhe
Radhe

कोरोना काळातील आतापर्यंतच्या इतर सिनेमांच्या डील बघता सलमान खानच्या ‘या’ सिनेमाची डील ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील आहे.

सुरुवातीला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते, मात्र नुकतेच ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. कोरोना आणि लॉकडाऊन यांच्यापूर्वीच हा सिनेमा तयार झाला होता, त्यामुळेच अशा अफवा आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभू देवा दिग्दर्शित ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा २०२० च्या ईदलाच प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे सणांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली. आता हा सिनेमा २०२१ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात सलमान खानसह दिशा पाटणी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा, गौतम गुलाटी महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा कोरियन चित्रपट ‘ द आउटलॉज़ ‘ चा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. सलमान खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा ‘भारत’ होता. या सिनेमात २०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती.

हे देखील वाचा