Friday, June 26, 2026
Home बॉलीवूड सलमान खानच्या करिअरला कलाटणी देणाऱ्या ‘वॉन्टेड’ चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण

सलमान खानच्या करिअरला कलाटणी देणाऱ्या ‘वॉन्टेड’ चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण

बॉलिवूडमध्ये दरवर्षी १५०० पेक्षा अधिक सिनेमे प्रदर्शित होतात. मात्र यातले मोजकेच चित्रपट कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनावर कोरले जातात. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक असा सिनेमा येतो जो त्यांचे संपूर्ण करियर आणि सोबतच त्याचे जीवनही बदलून टाकतो. असाच एक सिनेमा बॉलिवूडचा दबंग खान असणाऱ्या सलमान खानच्या आयुष्यातही आला, आणि तो म्हणजे ‘वॉन्टेड’. ज्या सिनेमाने सलमानच्या करियरला पुन्हा उभारी दिली आणि सर्वांना हे दाखवून दिले की अजून सलमान खान संपला नाही.

आज या ‘वॉन्टेड’ सिनेमाला १२ वर्ष पूर्ण झाली आहे. १८ सप्टेंबर २००९ साली ईदच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. ऍक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरिओग्राफर प्रभुदेवा याने केले होते. सलमान खानला एक ऍक्शन स्टार म्हणून पुन्हा नव्याने झळाळी याच चित्रपटाने दिली. या सिनेमातील ऍक्शन, ड्रामा, गाणी, संगीत सर्वच बाबतीत हा सिनेमा उजवा ठरला. या सिनेमाने सलमान खान आणि ईद हे समीकरण जुळून आणले होते. समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्ही महत्वाच्या बाजूने सलमान खानला या सिनेमासाठी सकारत्मक प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतले.

आज सिनेमात सलमान खान आहे म्ह्टल्यावरच त्याचे सिनेमे १०० कोटींचा व्यवसाय सहज करतात. एवढेच काय तर त्याचा फ्लॉप सिनेमा देखील १०० पेक्षा अधिक कोटींची कमाई करतो. हे सर्व शक्य झाले ते फक्त सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ सिनेमामुळेच. या चित्रपटात सलमान खानने एका अंडरकव्हर पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. जो वरवर गुंडांमध्ये जरी राहत असला तरी त्याचे खरे काम हे समाजाला आणि मुंबई शहराला या गुंडांच्या तावडीतून कायमचे सोडवण्याचे असते. सलमान एक अंडरकव्हर ऑफिसर आहे, हे सत्य शेवट उलगडत असले तरी संपूर्ण सिनेमात त्याने एक गुंडा म्हणून तेवढीच लोकप्रियता मिळवली जेवढी एक हिरो म्हणून सर्वांना मिळते.

सिनेमाची कथा दहा वर्षांपूर्वी अगदी नवीन आणि हटके असल्याने सिनेमाला त्याचा फायदा झाला. या सिनेमात सलमानसोबतच विनोद खन्ना, प्रकाश राज, महेश मांजरेकर, आयशा टाकिया आदी अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. प्रभुदेवाच्या या दणदणीत दिग्दर्शकीय पदार्पणानंतर त्याने अनेक हिट सिनेमे दिले.

वॉन्टेड सिनेमा २००६ साली आलेल्या ‘पोकरी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. वॉन्टेडमधील सलमानची स्टाइल, अंदाज खूपच भाव खाऊन गेला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

 

हे देखील वाचा